आतापर्यंत माणसांसाठी स्वेटर विणलेले तुम्ही ऐकले असलेच, फारफार तर हत्तींसाठीही स्वेटर विणल्याचे तुम्ही पाहिले असतील पण कधी कोंबड्यांसाठी स्वेटर विणले गेल्याचे पाहिले आहे का? अहो हा विनोद वगैरे अजिबात नाही. मिल्टन मधल्या फ्लूरेल गावात एका क्लबने कोंबड्यांसाठी स्वेटर विणण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

या भागात अनेक लोक कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. थंडीच्या दिवसात अनेक कोंबड्यांचा थंडीमुळे मृत्यू होतो. तेव्हा या पक्ष्यांना उबदार ठेवण्यासाठी वेकफिल्ड चॅरिटेबल ट्रस्टने स्वेटर विणण्याचे काम हाती घेतले आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणा-या काही वृद्ध महिलांनी मिळून कोंबड्यांसाठी हे छोटे स्वेटर विणले आहेत. भारतात काही दिवसांपूर्वी हत्तींसाठी स्वेटर विणले होते यातूनच त्यांना प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मथुरामधल्या एका स्वयंसेवी संस्थेने हत्तीसांठी स्वेटर विणले होते. मथुरामध्ये हत्तींचे पुनर्वसन केंद्र आहेत. या केंद्रात जवळपास २० हत्ती आहेत. यातील काही हत्ती जखमी अवस्थेत येथे आणले होते. शिकार आणि तस्करांच्या तावडीतून वाचवलेल्या हत्तींना या पुनर्वसन केंद्रात आणण्यात आले. यातल्या काही हत्तींना डोळ्यांनी नीट दिसतही नाही. येथे त्यांची काळजी घेतली जाते. या पुनर्वसन केंद्राच्या बाजूला राहणा-या गावकरी महिलांनी थंडीपासून हत्तींचे संरक्षण व्हावे यासाठी वर्षभर मेहनत करून स्वेटर विणले होते

Story img Loader