शाळा….या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय, याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतलं प्रेम,मित्रांसोबत केलेली मस्ती,मैदानवरचे खेळ, सरांचे बोलणेे,पेपरला केलेली कॉपी,तास चालू असताना केलेली बडबड,सगळ आठवत आता. शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. काही जण मग स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात. असाच एक प्रकार पुण्यातील एका शाळेत पाहायला मिळाला. मात्र हा शाळेचा गृप १०, २० वर्षांनी नाही तर तब्बल ७९ वर्षांनंतर एकमेकांनी भेटलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये काही आजी-आजोबा गेट-टुगेदर करताना दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हा शालेय ग्रुप तब्बल ७९ वर्षानंतर एकमेकांना भेटतोय. अन् इतक्या वर्षांनंतरही ते धम्माल मस्ती करताना दिसत आहेत. आजच्या तारखेला त्यांचं वय हे किमान ८०-९० च्या आसपास असेल. मात्र या वयातही ही मंडळी तरुणांना लाजवतील अशा उत्साहानं आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून अनेकजण शाळेच्या जुन्याआठवणीत हरवून गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: स्मशानभूमीत सुरु आहे चहाचं दुकान, ७२ वर्षांपासून लोकांची तुफान गर्दी, कबरीच्या बाजूलाच लोक…

१९५४ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेसलन असंच कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आणि त्या कॅप्शननंच अनेकांच्या डोळ्यात आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. इतक्या वर्षांनंतरही शाळेतली नाती जपत या मंडळींचं एकत्र येणं आणि पुन्हा तेच दिवस जगणं हे सर्वकाही पाहताना नेटकऱ्यांनाही त्यांची शाळा आठवली. 