वाढत्या उष्णतेमुळे कोल्ड आणि सॉफ्ट ड्रिंक पिणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक पिणे आरोग्यासाठी चांगेल नाही हे माहित असूनही आपल्यापैकी बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. वडीलधारी मंडळी डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरही अनेक जण सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक पिणे टाळत नाही. प्लास्टिकच्या बॉटलमधून कोणतेही ड्रिंक पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे हे अनेक अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी प्लास्टिकऐवजी अ‍ॅल्युमिनिअम कॅनमधून कोल्ड ड्रिंक पिण्यास पसंती देतात पण ॲल्युनिमिअम कॅनच्या सुरक्षिततेबाबत बहुतांश लोकांना माहिती नसते. अ‍ॅल्युमिनिअम कॅनमध्ये लपलेल्या रहस्याचाचा खुला एका इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरने व्हिडिओ पोस्ट करून केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कित्येक वर्षांपासून ॲल्युनिअम कॅनमध्ये होतोय प्लास्टिकचा वापर
योग आणि पोषणपेक आदित्य नटराज यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये सॉफ्ट ड्रिक किंवा कोल्ड ड्रिंकसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टील आणि ॲल्युमिनियमच्या कॅनमध्ये लपलेले प्लास्टिकचे आवरण स्पष्टपणे दिसत आहे. हा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ पाहून सर्वांना आश्चर्य व्यक्त केले आहे. हा प्रकार गेल्या कित्येक दशकांपासून सुरू आहे पण अ‍ॅल्युनिअम कॅन ड्रिंक पिणाऱ्यांना हे माहित नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हिडिओमध्ये, आदित्य नटराज कोक कॅनचे बाहेरील पेंट काढण्यासाठी प्रथम सँडपेपर वापरतो. नंतर, एका काचेच्या पात्रात हेवी-ड्युटी ड्रेन क्लीनर ओततो आणि त्यात एका स्ट्रॉच्या मदतीने कॅन बुडवतो. काही मिनिटांनंतर कॅनचे अ‍ॅ ल्युमिनिअम कोटिंग पूर्णपणे विरघळते. काही वेळाने त्यातून बाहेर काढल्यावर त्यात पारदर्शक प्लास्टिकचे आवरण स्पष्टपण दिसते.

शीतपेयातील साखर आणि कॅनमधील मायक्रोप्लास्टिक्सचे मिश्रण रोखण्यासाठी हे वापरले जाते.
आदित्य नटराजने त्यांच्या प्रयोगाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “कोक आणि इतर कोल्ड ड्रिंकच्या कॅनमध्ये प्लास्टिकचा पातळ थर असतो. ते कोल्ड ड्रिंकच्या आतून कॅनशी संपर्क होणे टाळते. कॅनमधील प्लॅस्टिक ड्रिंक्समध्ये मायक्रोप्लास्टिक्स आणि इतर विषारी पदार्थांचे कण मिसळणे टाळते.

हेही वाचा – भक्तांनो, आता घरबसल्या घ्या प्रभु रामाचे दर्शन! राम मंदिरातील आरतीचे दूरदर्शन करणार थेट प्रेक्षपण

आदित्य नटराज यांनी वैज्ञानिक तर्क सांगितला

आदित्य नटराज यांनी यामागचे वैज्ञानिक तर्कही सांगितले आहे. त्यांनी लिहिले, “कोल्ड ड्रिंकचे कॅन ॲल्युमिनियम मिश्र धातुचे बनलेले आहेत आणि येथील ड्रेन क्लीनर हे NaOH (सोडियम हायड्रॉक्साइड) चे मिक्षण आहे. हे दोन्हीची एकमेकांवर रासायनिक प्रक्रिया होते. यामुळे भरपूर उष्णता निर्माण होते. ड्रेन क्लीनर (NaOH) फक्त ॲल्युमिनियमवर प्रतीक्रिया करते आणि ते विरघळतो. ते प्लास्टिकच्या थरावर प्रक्रिया करत नाही. म्हणूनच NaOH सहसा प्लास्टिकच्या कॅनमध्ये साठवले जाते.

विशेषतः, ॲसिडिक पेये ॲल्युमिनियममध्ये मिसळण्यापासून रोखण्यासाठी आणि रासायनिक प्रक्रिया टाळण्यासाठी कॅनला आतून प्लास्टिकचा थर वापरतात. शास्त्रज्ञ आणि कोल्ड ड्रिंक उद्योगातील लोकांना याची माहिती आहे, परंतु आता सामान्य लोकांना याची माहिती येऊ लागली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revealing hidden plastic layer inside soft drink cans viral video snk