तुम्ही आजपर्यंत ढग कसे बनतात हे शाळेत शिकत असताना पुस्तकात वाचलं असेल. पण तुम्ही कधी ढग तयार होताना कधी पाहिलंय का? ढग कसे बनतात आणि ते आकाशात कसे तरंगतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रिव्हर्स क्लाउड वॉटरफॉलचं अप्रतिम दृश्य दिसत आहे. हे दृश्य पाहून तुमचे मन अगदी प्रसन्न होऊन जाईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ढगांची रचना कापसाच्या मोठा महाकाय मऊ मऊ बोळ्याप्रमाणे झालेली दिसून येतेय. यातील पातळ रेशमी तारा एकत्र होऊन जणू काही एखादी कॉटन कॅंडीच तयार होते की काय, असं वाटू लागतं. गोलाकार ढगांच्या रेशमी तारा पर्वताच्या पलीकडे वाहत जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहताना जणू काही स्वर्गच पाहतोय की काय असा भास होऊ लागतो. व्हिडीओमध्ये स्लो मोशनमध्ये गोलाकार स्वरूपात ढग तयार होताना दिसत आहेत. डोळ्यांचं पारणं फेडणारा व्हिडीओ सध्या लोक मोठ्या उत्सुकतेने पाहत असून तो मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय.
आणखी वाचा : न्यूयॉर्कमधील सुंदर सनसेट टिपण्यासाठी लोकांनी वाहतूकच थांबवली, १० मिलियनहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातला असल्याचं सांगण्यात येतंय. हा व्हिडीओ तसा जुनाच आहे, पण सध्या तो नव्याने व्हायरल होऊ लागलाय. पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या स्टर्लिंग रेंजमधील ब्लफ नॉल शिखरावर ढग फिरतानाचे हे नयनरम्य दृश्य स्टोरीफुलने उपलब्ध करून दिले आहे. स्टोरीफुलच्या म्हणण्यानुसार, सूर्योदयानंतर थोड्याच वेळात जोगर गोसरानीने गेल्या वर्षी त्याचे शूटिंग केले होते. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल होऊन अनेक ट्विटर हॅंडलवरून तो शेअर करण्यात येतोय.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : …अन् खड्ड्यात पडले स्कुटीस्वार पती-पत्नी, हा धक्कादायक VIRAL VIDEO पाहून हादरून जाल
सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसणारा प्रसंग खरा आहे. निसर्गाचा चमत्कारच जणू. हा व्हिडीओ आश्चर्यचकित करण्यासोबतच निसर्गाच्या किमयेचं उदाहरण देतो. ढग निर्मीती पाहण्यासारखं दुसरं सुख नाही, अशाच काहीशा प्रतिक्रिया लोक या व्हिडीओवर शेअर करत आहेत. वंडर ऑफ सायन्सच्या एका पोस्टला ३ लाख ४७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आणि १० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
आणखी वाचा : त्सुनामी सारखे ढग तुम्ही कधी पाहिलेत का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाचVIRAL VIDEO : याला म्हणतात टॅलेंट! कमल हासन यांच्या ‘Vikram’चं गाणं बादलीवर वाजवणाऱ्या या दृष्टीहीन व्यक्तीचं गाणं एकदा ऐकाच!
या महिन्याच्या सुरूवातीला, एका चित्तथरारक व्हिडीओमध्ये ढगांची एक मोठी निर्मिती दिसली होती, जे एका रिकाम्या रस्त्यावरील घरांच्या रांगेत फिरत होता. पहिल्या नजरेत हे ढग एखाद्या त्सुनामी सारखेच दिसून आले होते. याला आर्कस किंवा रोल क्लाउड म्हणून ओळखले जाते. याचा सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.