Reverse Waterfall In Maharashtra Video : भारत निसर्ग सौंदर्यांने नटलेला असतानाच डोंगरमाथ्यावर असलेल्या सुंदर धबधब्यांनी त्यात आणखी भर टाकली आहे. दुधसागरासारखे हे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदूच बनतात. महाराष्ट्रालाही अनेक सुंदर धबधब्यांनी विळखा घातला असून पावसाळी हंगामात पर्यटकांना निसर्गाचं नयनरम्य दृष्य पाहायला मिळतं. डोंगराच्या कुशीत लपलेल्या धबधब्यांवर हजारो पर्यटक पाण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जात असातात. पण महाराष्ट्राच्या एका धबधब्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण या पर्यटक या धबधब्यावर गेल्यावर थक्क होतात. कारण डोंगरमाथ्यावर असतानाच या धबधब्याचं पाणी खालून वर येतं आणि सर्वांनाच भिजवून टाकतं. हेच नानेघाट निसर्गाचं वैशिष्ट्य आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नानेघाट धबधबा

हा अनोखा धबधबा महाराष्ट्राचा ‘नानेघाट वॉटरफॉल’ म्हणून ओळखला जातो. हा धबधबा कोकणचा समुद्र किनारा आणि जुन्नर नगर परिसरात आहे. जर तुम्ही मुंबईहून नानेघाट वॉटरफॉलला जात असाल, तर तुम्हाला जवळपास १२० किमीचा प्रवास करावा लागेल आणि पुण्याहून नानेघाटला जाण्यासाठी जवळपास १५० किमीचा प्रवास करावा लागतो. या धबधब्याला रिव्हर्स वॉटरफॉलही म्हणतात.

नक्की वाचा – काळ आला होता पण वेळा नाही! घाटात प्रवास करणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडीओ मिस करू नका

इथे पाहा व्हिडीओ

धबधब्याच्या पाण्याचा स्त्रोत नानेघाटातील डोंगरांमध्ये आहे. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं. येथील सौंदर्य पाहून मनप्रसन्न झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी असते. पण अनेकांना या धबधब्याचं वैशिष्ट्य पाहून आश्चर्य वाटलं आहे. धबधब्याचं पाणी खालच्या दिशेनं पुन्हा वर कसं येतं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

धबधब्याचं पाणी पुन्हा परत का येतं?

गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे या धबधब्याचं पाणी डोंगरावर येतं. वरून पडलेली वस्तू जमिनीवर खाली पडेत, हे सर्वांना माहित आहे. परंतु, नानेघाट वॉटरफॉलला हा नियम लागू होत नाही. हा धबधबा डोंगरमाथ्यावरून वाहतो आणि पुन्हा वरच्या दिशेनं परत येतो. याच कारणामुळे लोकं दूरच्या ठिकाणाहून या धबधब्याला पाहायला येतात. या धबधब्याची खासीयत पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या जागेवर हवा खूप जोरात येते, त्यामुळे पाणी विरुद्ध दिशेनं परत येतं. हवेच्या वेगामुळे खाली पडणारं पाणी डोंगरावर पुन्हा परत येतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reverse waterfall in maharashtra naneghat have you ever visited watch nature beautiful video nss