जंगलात सफारीसाठी अनेक पर्यटक जातात. पण या पर्यटकांच्या मागे जंगलातील एखाद्या प्राण्याने पाठलाग केल्याचा तुम्ही पाहिलंय का? सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून तुम्ही जंगल सफारीला जाण्याआधी नक्की विचार कराल. सोशल मीडियावर अनेकदा जंगलातील प्राण्यांचे किंवा सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असतात. पण हा व्हिडिओ नक्कीच वेगळा आहे. यामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या मागे भयानक गेंडा लागतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर नक्कीच शहारे येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आसाममधील बक्सा येथील मानस नॅशनल पार्कमधील असून तेथील वन अधिकाऱ्यांनी तो शूट केला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भयानक गेंडा कशाप्रकारे पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करत आहे. तर गाडीमधील पर्यटक गाडी वेगात चालवण्यासाठी ड्रायव्हरला सांगत आहेत. गेंडा ज्या पद्धतीने गाडीचा पाठलाग करत आहे, त्यावरून गेंडा चांगलाच संतापलेला असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेंड्याने गाडीचा असा केला पाठलाग..

( हे ही वाचा: तरुणीला मांडीवर बसवून ‘तो’ बाईक चालवत राहिला; Video व्हायरल होताच पोलिसांनी अशी केली अवस्था)

मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडिओमधील घटना २९ डिसेंबरला घडली असून या घटने दरम्यान जीवितहानीबद्दल कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत २१ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर अनेकजण यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.