लग्न म्हटलं लग्नपत्रिका ही हमखास असते. आज-काल लग्न सोहळे अत्यंत दिमाखदार पद्धतीने केले जातात. त्यामुळे लग्न सोहळ्यातील प्रत्येक गोष्ट काहीतरी खास असली पाहिजे असा हट्ट नवरा नवरीचा असतो. त्यामुळे लग्नाच्या पत्रिका असो किंवा पोशाख त्यामध्ये काही ना काही वेगळं अनेकांना हवे असते. अनेकदा अशा हटके लग्नपत्रिकेची चर्चा सोशल मीडियावर होत असते. कोणी रुमालावर लग्नपत्रिका छापते तर कोणी खिशात मावेल इतकी छोटी पत्रिका तयार करतो, तर कोणी संस्कृतमध्ये पत्रिका तयार करतो. सोशल मीडियावर सध्या अशाच एका पत्रिकेचे चर्चा होत आहे. लग्नपत्रिकाच नव्हे लग्न सोहळाच आगळा वेगळा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण हा लग्न सोहळ्यात नवरा, नवरी, वधूचे आई-वडील कुटुंब, नवाऱ्याचे आई-वडील आणि कुटुंब सर्व अतरंगी आहेत. या मजेशीर लग्नपत्रिका वाचून तुम्ही पोट धरून हसायला भाग पाडले. आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्यातील नवरदेव चिं. भात आणि चि. सौ. कां. चपाती आहे. आता भात आणि चपातीच्या लग्नसोहळा कसा असणार आणि लग्नात कोणकोण हजेरी लावणार आहे हे जाणून घेऊ या..

नवरदेव चिं. भात

नवरदेव चिं. भात याच्या आई म्हणजेच श्रीमती तांदळाबाई बारीकखडे या देखील लेकाच्या लग्नासाठी उपस्थित राहणार आहे. श्रीमती तांदळाबाईंचा पत्ता देखील त्यांच्यासारखा खास आहे. मु. पो. पांढरी कोटी, ड्रमच्यामागे आतली खोली.

हेही वाचा – Video : “अक्षय का विषय बहोत हार्ड है!”, अंघोळीला वैतागलेल्या चिमुकल्याने तयार केला भन्नाट रॅप; एकदा ऐकाचं, पोट धरून हसाल

नवरी चि. सौ. कां. चपाती

नवरी चि. सौ. कां. चपाती यांचे पिताश्री श्री. गहूराव पांढरे देखील आपल्या कनिष्ठ कन्येला आशीर्वाद देण्यासाठी लग्नात उपस्थित राहतील. गहूरावांचा पत्ता मात्र सर्वांना माहित असेल, मुं. पो. जर्मनचा डब्बा, तिसरी रॅक, स्वयंपाक घर

लग्नाला हटके पद्धतीने दिले आमंत्रण

“माणूस जन्माला आला तेव्हा भुकेला होता. आजही आहे आणि राहणारच. भुकलेल्यांना तृप्त करण्याकरता रोज सकाळ संध्याकाळ होणाऱ्या या विवाहात उपस्थित पाहून आपली भूक शांत करा” अशा शब्दांमध्ये लग्नाचे आमंत्रण देखील हटके पद्धतीने केले आहे जे वाचून तुमची भूक नक्कीच वाढेल.”

विवाह मुहूर्त आणि विवाह स्थळ

रोज भुकेल्या जीवांना शांत करणाऱ्या चिं. भात आणि चि. सौ. कां. चपाती यांच्या अनोख्या लग्नाचा मुहूर्त देखील अत्यंत खास आहे. “प्रत्येक महिन्यात, प्रत्येक दिवशी उपवासाचा दिवस सोडून”

विवाह स्थळ ठरलेलं आहे, “सर्वांच्या स्वयंपाक घर”डायनिंग टेबलावर स्टिल ताटात…”

हेही वाचा – Video : “लहानपणी हा खेळ कोणी खेळला आहे?” चिमुकल्यांचा खेळ पाहून आठवतील बालपणीचे दिवस

आग्रहाचे आमंत्रण देणा कृपाभिलाषी

लाडक्या भात आणि चपातीच्या लग्नाला सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देणारे सौ, आलूताई तिखट भाजी, सौ तुरी ताई वरणे, श्री वांगेराव तिखट भाजी, श्री फिकेराव वरणे यांचा कृपाभिलाषी म्हणून मान देण्यात आला आहे.

लाडक्या दादाच्या लग्नाला आमंत्रण देणारे छोटे निमंत्रक

पत्रिकेच्या शेवटी आपल्या लाडक्या दादाच्या लग्नाला यायंच बरं का म्हणणारे छोटे निमंत्रक म्हणून लोणचं पापड, कांदा, टमाटर, मिर्ची…या बच्चेकंपनीचा उल्लेख देखील आवर्जून केला आहे.

हा लग्नसोहळा खरोखर आगळा-वेगळा आहे. आपल्या सर्वांच्या घरात हा लग्नसोहळा रोज पार पडतो पण त्या लग्नाची पत्रिका मात्र तुम्ही कधीही पाहिली नसेल. हा फोटो comedy_watambe नावाच्या पेजवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सर्वात प्रमुख पाहुणे मीठराव राहिले की ते जरी नसले तर शोभाच नाही लग्नाला”

ही लग्नपत्रिका अनेकांना आवडली आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “खूप चांगली छापलेली आहे ही पत्रिका”

दुसरा म्हणाला, “मटर पनीरपण आहे ना त्यांना पण बोलवायचे असते.”

तिसरा म्हणाला, “खरचं वाचून हसू आले.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rice and chapati marriage invitation photo viral on social media snk