Emotional video: संघर्ष कोणाला चुकला आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष असतो. अशातच सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, तर काही व्हिडीओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात. यात काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे का? पण, काही व्हिडीओतून खऱ्या माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये तरुणाने जे केलंय ते क्वचितच कोणी करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माणुसकी म्हणजे “निस्वार्थपणे केलेली मदत” माणसाने माणसाला माणसा सारखं वागवणं म्हणजे माणुसकी. यात पोटजात,जात, पंथ,धर्म,भाषा,देश इत्यादी सर्व भेदाभेदां पलिकडे जाऊन फक्त माणूस म्हणून दुसर्‍याचा विचार करुन त्याला/तिला सहानुभूतीपूर्वक जमेल ती आणि जमेल तेवढी मदत करणे म्हणजे माणुसकी. त्यांच्या सुखदुःख्खात सहभागी होणे म्हणजे माणुसकी. कोणीही एका रात्रीत श्रीमंत होत नाही, त्यामागे त्या व्यक्तीची प्रचंड मेहनत आणि संघर्ष असतो. तो सुद्धा कधीतरी गरिबीतून गेलेला असतो. असे फार कमी लोक आहेत ज्यांना त्याची जाणीव असते. अशाच एका तरुणानं याचीच जाणीव ठेवत एका गरीबाच्या चेहऱ्यावर हसू आणलंय.

माणुसकीचं अनोखं दर्शन

या व्हिडीओमध्ये एक फुगेवाला आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन एका गाडीसोबत फोटो काढताना दिसतोय. तेवढ्यात गाडीचा मालक या फुगेवाल्याला पाहतो. आणि तू काय करतो आहेस असा जाब विचारतो. अर्थात गाडीच्या मालकाला पाहून फुगेवाला घाबरतो आणि माफी मागत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षवेधी बाब म्हणजे गाडीचा मालक त्या फुगेवाल्याला थेट आपल्या गाडीतच बसवतो आणि थोडं फिरवून आणतो. आयुष्यात पहिल्यांदा तो फुगेवाला इतक्या आलिशान गाडीत बसला असेल. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद झळकला त्याबद्दल खरंच शब्दात वर्णन करता येणार नाही.

गरीब फुगेवाल्याला बसवलं ५ कोटींच्या गाडीत

ही पोर्शे कंपनीची ७१८ ही मॉडेल आहे. ही गाडी दिसायला फारच आकर्षक दिसतेय. भारतात पोर्शे कारची किंमत किमान २ ते ५ कोटी रुपये इतकी आहे. पण इतक्या महागड्या कारमध्ये त्यानं एका गरीब फुगेवाल्याला बसवलं ही गोष्ट खरंच खूप मोठी आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कंगाल पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा; लोकांनी उद्धाटनाच्या दिवशीच मॉलमध्ये काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर princevermareal नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rich man gives a poor balloon seller a ride in his luxury porsche car emotional video goes viral on social media srk