Mukesh Ambani Gifts 1500 Crore Property: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे हृदयही मोठे आहे असे म्हणायला भाग पाडेल अशी एक माहिती सध्या समोर येत आहे. रिपोर्टनुसार, अंबानी यांनी मनोज मोदींना यांना तब्बल १५०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी गिफ्ट केली आहे. मनोज मोदींना अंबानींचा उजवा हात म्हणूनही ओळखले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतीच मोदींना कोट्यवधी रुपयांची बहुमजली इमारत भेट दिली आहे.
देशातील सर्वात मौल्यवान कंपनीत अब्जावधी-डॉलरच्या व्यवहारांच्या यशस्वी उलाढाली सांभाळणारा माणूस म्हणून मोदींना ओळखले जाते. याच कामाचे बक्षीस म्हणून, अंबानी यांनी मोदींना २२ मजली इमारत भेट दिली आहे. ही मालमत्ता मुंबईतील प्रीमियम नेपियन सी रोड येथे आहे. मॅजिकब्रिक्स डॉट कॉमच्या माहितीनुसार, ही इमारत काही महिन्यांपूर्वी भेट दिली होती.
मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चे दीर्घकाळ कर्मचारी आहेत. मोदींना गिफ्ट म्हणून मिळालेली ‘वृंदावन’ नावाची नवीन मालमत्ता मुंबईतील नेपियन सी रोडवरील महागड्या परिसरात आहे. विशेष म्हणजे JSW समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल हे देखील नेपियन सी रोड येथील माहेश्वरी नामक घरात राहतात.
नेपियन सी रोडवरील निवासी मालमत्तांची किंमत साधारणपणे ४५,१०० ते ७०,६०० रुपये प्रति चौरस फूट आहे. मोदींच्या नवीन इमारतीची किंमत १५०० कोटी रुपये आहे. याचा प्रत्येक मजला ८००० स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे आणि इमारतीचे एकूण क्षेत्रफळ १.७ लाख स्क्वेअर फूट आहे.
हे ही वाचा<< अनंत अंबानीच्या फिटनेस ट्रेनरचे मानधन ऐकून व्हाल थक्क! १०८ किलो वजन कमी करताना दिला होता ‘असा’ डाएट
दरम्यान, नोंदणी दस्तऐवजात समोर आलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी येथील रहेजा विवरे येथील दोन अपार्टमेंट्स सध्या मोदींनी विकले आहेत. २८ व २९ व्या मजल्यावर असलेल्या २,५९७ चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेल्या या फ्लॅटची किंमत ४१. ५ कोटी रुपये होती