Emotional Video Viral : संघर्ष कोणाला चुकला आहे, जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला सुंदर आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. पण कितीही संकटं आली तरी खचायचे नाही, त्याचा निर्भीडपणे सामना करायचा. अनेकदा जगण्यासाठी आपला संघर्ष तर सुरु असतोच पण इतरांना त्यांच्या संघर्षमय काळात मदतीची गरज असते. मग ही मदत लहान असो वा मोठी. अशात सोशल मीडियावर माणसातील माणुसकीचे दर्शन घडवणारा एक व्हायरल होत आहे, ज्यात दोन गरीब चिमुकले पिण्याच्या पाण्यासाठी रस्त्यावर फिरत होते. तेव्हा एक रिक्षा चालक त्यांच्या जवळ थांबून त्यांना पिण्यासाठी पाणी देतो, हे पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ खरंच काळजाला भिडणारा आहे.

तुम्ही प्रवास करताना पाहिलं असेल, अनेक गरीब लहान-लहानं मुलं रस्त्याच्या कडेला वस्तू विकत असतात. काहीवेळा त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडीलदेखील नसतात. अशी मुलं उन्हा-तान्हात ट्रॅफिकमध्ये फिर-फिर फिरत त्या वस्तू विकतात. कोणी काही देईल ते खातात, काहीवेळा भीक मागून खातात, अशा मुलांना पाहिल्यानंतर आपल्यालाही फार दु:ख होते. या परिस्थितीत लोकं मदत करणं दूर, पण त्यांच्या आई-वडिलांना दोष देऊन निघून जातात. पण, एक माणूस म्हणून तुम्हाला त्यांना छोटीशी का होईना मदत करता आली तर केली पाहिजे. तुमची एक छोटी मदत भले त्यांचे आयुष्य बदलणारी नसेल पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी ठरु शकते.

The deer risked its own life to save the cub
‘आई, तू परत ये ना…’ पाण्यात पोहणाऱ्या मगरीपासून पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी आईने केलं असं काही… VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
cat saves from pack of 4 dogs
Video : मांजरीचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीची झुंज; चक्क चार श्वानांना लावलं पळवून!
Moong vadyachi rassa bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मुग वड्याची रस्सा भाजी; झक्कास होईल बेत
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

तहानलेल्या चिमुकल्यांना मदत करून घडवले माणुसकीचे दर्शन

या व्हायरल व्हिडीओमध्येच पाहा ना, एक रिक्षाचालक भरउन्हात रिक्षा घेऊन जात होता. यावेळी रस्त्यावरील दोन लहान मुलं पिण्याच्या पाण्यासाठी बाटली घेऊन उभे होते. यावेळी एक रिक्षाचालक त्यांना बघताच रिक्षा थांबवतो आणि आपल्या पिण्याच्या बाटलीतील पाणी त्यांना देतो. भरउन्हात तहानेने व्याकूळ झालेली ही मुलं पाणी मिळताच सुखावतात. यावेळी बाटली घेऊन लगेच ते रस्त्याच्या बाजूला धावत जातात आणि गटागट पाणी पिऊ लागतात. पाणी मिळाल्यानंतरचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. ही एक छोटीशी मदत त्यांना त्यावेळी लाखमोलासारखी होती.

हेही वाचा – VIDEO : पै-पै जोडून उभा केलेला संसार अक्षरश: पाण्यात; घाटकोपरमधील मनाला चटका लावणारे दृश्य

हा सुंदर व्हिडीओ @Gaikwad_Vkiram नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लिहिलेय की, देवाने दिलेलं थोडं इतरांनाही देऊन पाहावं, देव होता आलं नाही तरी माणून होऊन पाहावं. अनेकांना हा हृदयस्पर्शी व्हिडीओ खूप आवडला आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या भावनिक कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, आज पाहिलेला सर्वात सुंदर व्हिडीओ. अशाप्रकारे युजर्स व्हिडीओवर हार्ट इमोजी पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.