काश्मिरी पंडितांची व्यथा मांडणारा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जेव्हापासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून तो चर्चेत आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा हा चित्रपट लोकांना इतका आवडला आहे की तो बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. लोकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. यादरम्यान, एका रिक्षाचालकाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या रिक्षाचालकाने ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. ही ऑफर ऐकून तुम्हालाही या रिक्षाचालकाचं कौतुक वाटेल. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या रिक्षाचालकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये रिक्षाचालक ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बघायला जाणाऱ्या काही महिलांना सिनेमागृहात सोडताना दिसत आहे. विशेष म्हणजे चालक या महिलांकडून रिक्षाचे भाडे घेण्यास नकार देताना दिसत आहे.

बापरे! या स्कुटीवर नक्की कितीजण बसले आहेत? Viral Video पाहून नेटकरीही झाले हैराण

रिक्षाचालकाचे म्हणणे तुम्ही या व्हिडीओमध्ये ऐकू शकता. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटासाठी ही त्याची जनसेवा असल्याचे रिक्षाचालक म्हणतो. प्रत्येक हिंदूने हा चित्रपट पाहावा, असे रिक्षाचालक त्यांना सांगत आहे. तो महिलांना हात जोडून म्हणतो की, तुम्ही ‘द काश्मीर फाइल्स’ पाहायला आला आहात, त्यामुळे मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. रिक्षाचालकाचा हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला भिडणारा आहे.

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रिक्षाचालकाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करताना लिहिले की, ‘भारत, मानवता, शत शत नमन। कृतज्ञ।’ विवेक अग्निहोत्री व्यतिरिक्त हा व्हिडीओ इतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनीही शेअर केला आहे. दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ हा अतिशय लोकप्रिय चित्रपट ठरला असून त्याने आतापर्यंत २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.