Ricky Pond dance in front of Gateway of India: सोशल मीडियावर परदेशातील लोकांना बॉलीवूड गाण्यांवर थिरकताना आपण अनेकदा पाहिलं असेल. बॉलीवूडची लोकप्रियता सातासमुद्रापार गेली असून अनेक जण आता या गाण्यांवर थिरकू लागले आहेत. दरदिवशी असे लाखो व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो.

यादरम्यान आता सोशल मीडिया स्टार आणि यूएस ‘डान्सिंग डॅड’ रिकी पाँडने एक नवीन डान्स व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत रिकी पाँडने त्यांच्या मुलासह गेटवे ऑफ इंडिया येथे एका लोकप्रिय बॉलीवूड गाण्यावर ठेका धरला आहे. रिकी पाँड आता भारतात येऊन हिंदी गाण्यावर ठेका धरतायत हे पाहून चाहते भलतेच खूश झाले आहेत.

Reshma Shinde Dance Video
Video : रेश्मा शिंदेचा ऑनस्क्रीन जाऊबाईसह जबरदस्त डान्स! छत्तीसगढ़ी गाण्यावर धरला ठेका, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Action taken against dancer and twenty customers at Panchgani hotel satara news
पाचगणीत हॉटेलमध्ये नृत्यांगना आणि वीस ग्राहकांवर कारवाई
Zee Marathi Makar Sankrant Celebration dance video
Video : ‘झुकेगा नहीं साला…’, अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डॅडी अन् बाई आजीचा जबरदस्त डान्स! दोघांच्या हटके स्टाइलने वेधलं लक्ष
Sakhi Gokhale and suvrat joshi dance on shahrukh khan lutt putt gaya song
Video: सखी गोखले-सुव्रत जोशीचा पहाटे २ वाजता शाहरुख खानच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video : महेश जाधवचा अभिनेत्रीबरोबर जबरदस्त डान्स; जुई तनपुरे व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा मावळा…”
aishwarya narkar dances on 56 years old bollywood song kajra mohabbat wala
“कजरा मोहब्बत वाला…”, ५६ वर्षे जुन्या गाण्यावर ऐश्वर्या नारकरांचा सुंदर डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, कमेंट्सचा पाऊस
Vallari Viraj
Video: लीला, शिवा व सरूचा भन्नाट डान्स; वल्लरी विराजने शेअर केला व्हिडीओ, अभिनेत्रीच्या कमेंटने वेधले लक्ष

हेही वाचा… तरुणाच्या कलाकारीला तोड नाही! अवघ्या सेकंदांत १६ ठिपक्यांपासून साकारले गणपती बाप्पाचे सुरेख चित्र

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओची सुरुवात रिकी पाँड आणि त्यांचा मुलगा डॅलिनच्या हटके डान्स स्टेपने होते. २००० साली प्रदर्शित झालेल्या संजय दत्तच्या ‘कुरुक्षेत्र’ या चित्रपटातील ‘बन ठन चली’ या लोकप्रिय गाण्यावर बाप-लेक थिरकले आहेत. “मला नक्की माहीत नाही की इथे गर्दी माझ्या आणि डॅलिनच्या डान्समुळे झालीय की, गेटवे ऑफ इंडियामुळे झालीय”, असं कॅप्शन रिकी पाँड यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा… “सूनबाईचे ३,००० रुपये आले”, ‘लाडकी बहीण’चे पैसे आल्यावर सासू-सुनेने केला जबरदस्त डान्स; VIDEO VIRAL

युजर्सच्या प्रतिक्रिया

रिकी आणि त्यांच्या मुलाचा डान्स व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “मुंबईत आपले स्वागत आहे, आशा आहे की तुम्ही इथे अविस्मरणीय आठवणी निर्माण कराल.” तर दुसऱ्याने “सर, तुम्ही आमच्या देशाचा अभिमान वाढवला आहे, तुम्ही भारतीय संस्कृतीचे पालन करत आहात आणि हिंदी गाण्यांवर रील बनवत आहात याचा मला आनंद आहे”, अशी कमेंट केली.

हेही वाचा… Amazonने चक्क दोन वर्षांनंतर केली प्रेशर कुकरची डिलिव्हरी; पोस्ट Viral होताच कंपनीने दिली प्रतिक्रिया, “आम्हाला हे…”

‘डान्सिंग कॉप’ म्हणून प्रसिद्ध असलेले अमोल कांबळे यांनीदेखील या व्हिडीओवर कमेंट केली आणि लिहिलं, “आम्हाला आनंद आहे की तुम्ही आमच्या भारतीय कुटुंबातील सदस्य आहात, भारताकडून तुम्हाला खूप खूप प्रेम.”

Story img Loader