आजकाल आपण किती नकारात्मक घटना ऐकत असतो ज्यामुळे आपला माणुसकी, चांगुलपणा, प्रशासनावरील विश्वास कमी होत असतो पण कधीतरी काही सकारात्मक घटना समोर येतात जो हरवलेला विश्वास पुन्हा मिळवण्यास मदत करतात. RPF अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षपणा याचीच प्रचिती देत आहे. या अधिकाऱ्याने अशी कामगिरी केली आहे की जी पाहून सर्वजण त्याचे कौतूक करत आहे. सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर झालं असं की मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर एक महिला प्रवासीने जिचे ऑपरेशन झाले होते म्हणून व्हिलचेअरची मागणी केली. पण स्टेशनवर व्हिलचेअर उपलब्ध नव्हती. त्यानंतर महिला प्रवासीची ट्रेन सुटू नये म्हणून RPF अधिकाऱ्याने या वृद्ध महिलेला उचलून थेट कोचपर्यंत पोहचवले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आरपीएफ मुंबई मध्य विभागाने (RPF MUMBAI CENTRAL DIVISION) अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

हेही वाचा – रेल्वे ट्रॅक ओलांडत होती महिला अन् अचानक आलेली मालगाडी पाहून तिथेच पडली बेशुद्ध….पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

व्हिडिओ पाहून प्रत्येकजण आरपीएफमध्ये एएसआय पदावर कार्यरत मानसिंह कौतूक करत आहेत. मानसिंह यांनी गरजू महिला प्रवासीला उचलून थेट कोचपर्यंत नेऊन पोहचवले. या वृद्ध महिलेचे नुकतेच ऑपरेशन झाल्याचे समजते. त्यामुळे त्या महिलेला चालताना त्रास होत होता.

हेही वाचा – धो धो पावसात आनंदाने नाचताना दिसले झोमॅटो कर्मचारी; AI फोटोंनी जिंकले सर्वांचे मन

चालताना त्रास होत असल्याने महिलेने मागितली होती व्हिलचेअर

चालताना पायांना त्रास होत असल्यामुळे वृद्ध महिलेने मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर व्हिलचेअर मागितली होती. पण तिथे कोणतेही व्हिलचेअर उपलब्ध नसल्याने महिलेला कोचपर्यंत पोहचण्यासाठी उशीर झाला असता आणि तिची ट्रेन सुटण्याची शक्यता होती. दरम्यान परिस्थितीचा अंदाज घेऊन RPF अधिकारी मानसिंह यांनी कर्तव्यदक्षपणे महिलेचे ट्रेन सुटू नये म्हणून तिला उचलून घेतले आहे आणि कोचपर्यंत पोहचवेल

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडीओ

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओबाबत जेव्हा आरपीएफच्या अधिकाऱ्यांना प्रशंसा होत आहे. तसेच बोरवली सारख्या इतक्या मोठ्या स्टेशनवर व्हिलचेअर सारखी मुलभूत सुविधा नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या कारभार प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rif officer carries elderly woman in his arms up to her coach at borivali station mumbai snk
Show comments