Rikshaw Driver dragged Woman By Speeding Auto : कोल्हापूरमधील काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. एका महिला प्रवाशासी हुज्जत घालून तिला रिक्षाने २०० मीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षाचालकाने महिलेशी भांडण करून तिला रस्त्यावरून फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती समोर आली आहे.

एका व्यक्तीने रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला पण चालकाने….

प्रवाशांना त्यांच्या थांब्यापर्यंत सुखरूप पोहोचवणे आणि ग्राहकांची सेवा करण्याचं कर्तव्य रिक्षाचालकांचं असतं. ग्राहक हा देवासमान असतो, पण या रिक्षाचालकाच्या निर्दयीपणामुळे एका महिलेला अपघाताला सामोरं जावं लागलं. रिक्षाचालकाने महिलेशी अरेरावी करून तिला २०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. रिक्षा रस्त्यावरून जात असताना एका व्यक्तीने थांबण्याचा प्रयत्न केला पण चालकाने रिक्षा थांबवली नाही. ही धक्कादायक घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mumbi Cab Driver Arrested
Mumbai Cab Driver Arrested : मुंबईत १० मिनिटांच्या प्रवासासाठी घेतले २८,०० रुपये; NRI ची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Viral video of a fight between some local train passengers on a kandivali railway station is currently going viral on social media
कहरच! तरुणांनी मुंबईतील कांदिवली रेल्वे स्टेशनवर हद्दच पार केली; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?
Thane, passenger Thane railway station, train and platform,
VIDEO : रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या प्रवाशाला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान
Shocking video guy on Bike was Harrasing the School girls Got Good treatment from Police
VIDEO: आता तर हद्दच पार केली! बाईकवर आला अन् महिलेला अश्लिल स्पर्श करुन गेला; मात्र पुढे काय घडलं ते पाहाच

नक्की वाचा – तान्ह्या बाळाला कुशीत घेऊन आई चालवते रिक्षा, Video व्हायरल होताच नेटकरी झाले भावुक, म्हणाले, “कुणीतरी…”

इथे पाहा व्हिडीओ

दिल्लीतही घडली होती अशी धक्कादायक घटना

सहा महिन्यांपूर्वी राजधानी दिल्लीमध्ये अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली होती. एका महिलेला कारच्या बोनेटवरून दहा किमीपर्यंत फरफटत नेले होते. महिला कारला अडकल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रस्त्यावरून येजा करताना प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचं चित्र समोर आलं होतं. प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांकडून पोलिसांना सुरक्षिततेच्या प्रश्नावर नेहमीच आवाहन केलं जातं.

Story img Loader