Shocking video: सध्या फळांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या आंब्याचा सीजन सुरु आहे. सध्या विविध प्रकारचे आंबे बाजारात उपलब्ध असून उन्हाळ्यात आंबे खाण्याची मजा काही औरच असते. काही लोक तर दिवसाला 5 ते 6 आंबे कापून खातात तर काहीजण टोप भर आंब्याचा रस एका दिवसात फस्त करतात. मात्र ज्यावेळी आपण बाहेरुन विकतचा आमरस आणतो तेव्हा डोळे झाकून विश्वास ठेवत त्याचे सेवन करणं महागात पडणार आहे. कारण नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामध्ये चक्क सडलेल्या आंब्यांपासून आमरस तयार केला जात आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे विकतचा आमरस खाताना शंभर वेळा विचार कराल.
नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेच्या वतीने धाड टाकण्यात आली यावेळी धक्कादायक दृश्य निदर्शनास आली. बोनकोडे गावातील एका चाळीमध्ये अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या याच सडक्या आंब्यांपासून याठिकाणी आमरस बनविण्यात येत होता. या आमरस चे श्रीजी या नावाने बॅण्डिंग करुन हे घाणेरडे आमरस नवी मुंबईतील शहरात सर्वत्र विक्री करण्यात येत होते. रोज साधारण ६ हजार लिटर आमरस बनवून त्याची विक्री याठिकाणावरून करण्यात येत होती. आमरस बनविणाऱ्या कामगारांकडे फूड लायसन्सही नव्हते. मात्र तरीही बिनधास्तपणे आमरस बनविण्याचा कारखाना चालविण्यात येत होता. हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असून या कारखान्यावर तात्काळ कारवाई करत कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते, त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर संताप व्यक्त केला जात आहे.
पाहा व्हिडीओ
आजकाल कोणताही अन्नपदार्थ शुद्ध, चांगल्या प्रतिचा मिळेल याची कोणतीच खात्री नाही. चार पैसे कमावण्यासाठी असं घाणेरडं आमरस बनवून ते शेकडो घरात ताजं, रसायन आणि प्रिझर्वेटिव्ह विरहीत म्हणून विकलं जातंय. किमान आतातरी अशा नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या कारखाने आणि कंपन्यांवर तात्काळ कठोर केली जाणार असा सवाल आता नागरिकच विचारताहेत.