Rishabh Pant Accident: भारतीय क्रिकेट संघातील सदैव चर्चेत असणारा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला.ऋषभ पंतने सांगितले की, तो योग्य वेळी कारमधून बाहेर पडला, ज्या क्षणी तो कारमधून बाहेर पडला, त्याच क्षणी त्याच्या कारला आग लागली. त्यानंतर ऋषभ पंतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंत कार चालवत होता आणि तो एकटाच होता. आईला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीहून रुरकी येथील घरी जात असताना अपघात झाला. गाडी चालवताना अचानक डोळा लागल्याने हा प्रघात घडल्याचे समजत आहे. दरम्यान पंतच्या अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी सोशल मीडियावरून, फोनवरून, प्रत्यक्ष भेटून पंतची खुशाली जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऋषभ पंतला भेटण्यासाठी आज अभिनेता अनिल कपूर आणि अनुपम खेर हे डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. ऋषभची भेट घेतल्यानंतर अनिल कपूर यांनी ANI ला सांगितले की, “आम्ही त्याला आणि त्याच्या आईला भेटलो. त्याची प्रकृती स्थिर आहे. तो लवकर बरा व्हावा म्हणून लोकांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करतो,”. दरम्यान या भेटीने नेटकऱ्यांना मात्र जरा धक्काच बसला आहे. अनिल कपूर, अनुपम खेर व ऋषभ पंत यांचा आजवर काहीच संबंध आला नाही मग अचानक त्याच्या भेटीसाठी जाण्याचे कारण काय असं विचारणाऱ्या कमेंट्स या पोस्टखाली दिसत आहेत.

आणखी वाचा – Rishabh Pant Car Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऋषभ पंतच्या आईला फोन

अनेकांना तर या फोटोमध्ये अनिल कपूर यांनाच बघून धक्का बसला आहे. पहिल्यांदा अनिल कपूर म्हातारे दिसत आहेत अशा प्रतिक्रिया येत आहेत. तर आता या दोघांचा ३१ डिसेंबरचा प्लॅन असणार म्हणून उत्तराखंडला गेले असतील आणि आता पंतला पण भेटून येऊ असं ठरलं असेल असंही नेटकरी म्हणत आहेत.

अनिल कपूर ऋषभ पंतला भेटले आणि..

हेही पाहा – Rishabh Pant Car Collection: ऋषभ पंतच्या ताफ्यात ‘या’ महागड्या कारचा समावेश; पाहा गाड्यांची किंमत आणि खासियत…

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे काल निधन झाले होते, तरीही मोदींनी वेळात वेळ काढून पंतच्या घरी सुद्धा चौकशीसाठी फोन केला होता. तर भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंनी सुद्धा ऋषभ पंतची चौकशी केली आहे. विराटने ट्वीट करून त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर उर्वशी रौतेलाने सुद्धा अप्रत्यक्षपणे ऋषभसाठी फोटो पोस्ट करून प्रार्थना केली आहे

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant accident anil kapoor anupam kher meets in max hospital netizens brutally trolled saying 31 st december party svs