भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. यावेळी तो पूर्णवेळ भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसला नाही. केवळ भारत विरुद्ध झिम्बाब्वे या एकाच सामन्यात त्याला दिनेश कार्तिकच्या जागी खेळण्याची संधी मिळाली होती. ऋषभ सध्या सामने खेळत नसला तरीही तो कायम चर्चेत असतो. यामागचं एक कारण म्हणजे उर्वशी रौतेला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२८ साली ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. तथापि, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादामुळे नक्कीच त्यांचा एकमेकांशी काहीतरी संबंध होता, अशी चर्चा पुन्हा रंगू लागली. यानंतर चाहते ऋषभला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. नुकताच असाच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये क्रिकेटप्रेमी उर्वशीच्या नावाने ऋषभला चिडवताना दिसत आहेत. मात्र यावेळी ऋषभ पंतला राग अनावर झाला आणि त्याने मुलांना दिलेलं उत्तर आता व्हायरल झालं आहे.

Rishabh Pant Accident : भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात; देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरू

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका सामन्यादरम्यान पंत ड्रिंक्स आणि टॉवेल घेऊन सीमारेषेच्या बाजूने जात आहे. त्याचवेळी काही चाहते त्याला उर्वशीच्या नावावे चिडवू लागतात. यातील एक चाहता म्हणतो, “भाई, उर्वशी बोलवत आहे.” यावर ऋषभ खूपच चिडलेला दिसला. आधी तो तिथून निघून जात होता. मात्र लगेचच त्याने मागे वळून या मुलांना सणसणीत उत्तर दिले.

दरम्यान, ऋषभसोबत हे पहिल्यांदाच घडलेले नाही. गेल्या काही सामान्यांपासून त्याच्याबरोबर वारंवार अशा घटना घडत असून, यामुळे तो वैतागला आहे. यावेळीही ऋषभला या मुलांचे बोलणे अजिबात आवडले नाही आणि म्हणूनच त्याने मुलांना प्रत्युत्तर दिले. ऋषभ त्या मुलांना म्हणाला, “जाऊन घे मग.” त्याचे हे उत्तर ऐकल्यावर चाहतेही आश्चर्यचकित झाले.

ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

उर्वशी आणि पंत यांच्यादरम्यान सोशल मीडियावर थेट एकमेकांचा उल्लेख न करता बराच काळ वाद सुरु होता. काही दिवसांपूर्वी पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्याने, “मेरा पीछा छोड़ो बहन” असं म्हटलं होतं. यंदाचा विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळाला जात असून, सध्या उर्वशीही ऑस्ट्रेलियामध्ये आहे. यासंबंधीची पोस्टही तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती. यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishabh pant lashes fans saying urvashi rautela bula rashi hai comment icc t20 world cup indian cricket team pvp