भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनल्यानंतर भारतातील लोकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. देशवासियांनी हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हंटले आहे. इंटरनेटवरील अनेक युजर्सनी सुनक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक बड्या भारतीय नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीशा चिनॉयने रील पोस्ट केली

बॉलिवूड गायिका अलीशा चिनॉयने ऋषी सुनक यांचे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले. चिनॉयने इन्स्टाग्रामवर ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा एक रील शेअर केला आहे. हा रील पाहून अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एकदा पाहा.

( हे ही वाचा: भररस्त्यात शाळकरी मुलींची तुंबळ हाणामारी; एकीने झिंज्या उपटल्या तर दुसरीने बेल्ट काढत…पाहा Viral Video)

पत्नी अक्षता मूर्तीसोबत ऋषी सुनक राम सीतेच्या रुपात

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक आणि पत्नी अक्षता मूर्ती हे राम आणि सीतेच्या रुपात दाखवले आहेत. चिनॉयने गायलेले ‘चमकेगा इंडिया’ हे गाणे या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ऐकू येत आहे. ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांची लेक आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये भारतीय गायिकेने हा ऐतिहासिक क्षण असल्याचं म्हटलं आहे.

( हे ही वाचा: स्कूल बसमधील विंडो सीटवरुन मुलगा-मुलगीची तुंबळ हाणामारी; दोघांनी लगावली एकमेकांच्या कानशिलात,Video होतोय व्हायरल)

व्हिडिओ व्हायरल होत आहे

हा व्हिडीओ बऱ्याच प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या सर्वत्र ऋषी सुनक चर्चेचा विषय बनला आहे. अनेकांना त्याचा अभिमान वाटत आहे. अभिनंदन संदेशांपासून ते मीम्सपर्यंत ब्रिटनच्या पंतप्रधानांशी संबंधित अनेक कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi sunak and akshata murthy as ram sita by alisha chinai instagram reel trending viral must watch gps