सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम पहायला मिळत आहे. सर्व जण आपापल्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसून येत आहेत; तर या दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. त्यांनीसुद्धा त्यांच्या पद्धतीत दिवाळी साजरी केली आहे आणि त्यांनी त्यांच्या निवासस्थानी हिंदू बांधवांचे स्वागत करत दिवाळीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी दिवाळीपूर्वी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी १० डाउनिंग स्ट्रीट येथे हिंदू बांधवांना बोलवून घेत त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली आहे. पहिल्या फोटोत ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती दीपप्रज्व्लन करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत दिवाळीनिमित्त फुलं आणि मेणबत्ती यांची सजावट करण्यात आली आहे; त्या परिसरात ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचा सुंदर फोटो काढला आहे. तर तिसऱ्या फोटोत ऋषी सुनक हसत-खेळत हिंदू बांधवांशी संवाद साधताना दिसत आहेत. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी कशा प्रकारे हिंदू बांधवांचं स्वागत केलं, एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा.
पोस्ट नक्की बघा :
निवासस्थानी केलं हिंदू बांधवांचं स्वागत :
ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे खास फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आज हिंदू बांधवांचं स्वागत केलं. तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. शुभ दीपावली म्हणत, ‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव साजरा करा’ असे म्हणत युकेमधील आणि जगभरातील सगळ्यांना दिवाळीच्या खास शुभेच्छाही दिल्या आहेत; असे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
या खास क्षणाचे फोटो युके पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडियाच्या @10downingstreet या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत. ही पोस्ट पाहून अनेक जण त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. तसेच ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे खास फोटो आणि दिवाळीचं अनोखं सेलिब्रेशन सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.