Rishi Sunak Old Video Viral : ब्रिटनचे माजी मंत्री ऋषि सुनक यांचा एक २० वर्षांपूर्वीचा जुना व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा ऋषि सुनक फक्त २१ वर्षांचे होते. या व्हिडीओमध्ये ऋषि सुनक म्हणत आहे की, वर्कींग क्लासमधील कोणीही त्यांचे मित्र नाहीत. खरं तर भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आहेत, त्यांचे नाव या शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे हा जुना व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात सुनक म्हणतात की माझे उच्चभ्रू वर्गातील मित्र आहेत, उच्चवर्गीय देखील माझे मित्र आहेत, माझे मित्र हे कामगार वर्गातील देखील आहेत, परंतु ते खरोखर कामगार वर्गातून नाहीत. या व्हिडीओमध्ये ते ज्या प्रकारे श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकांना आपले मित्र म्हणून सांगत आहे त्याबद्दल सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीबीसी डॉक्युमेंट्री ‘मिडल क्लास – देअर राइज अँड स्प्रॉल’ मध्ये ऋषि सुनक असं म्हणताना दिसतात की, मी लोकांमध्ये मिळून मिसळून असतो, त्यानंतर मी इनर सिटी स्टेट स्कूलच्या मुलांना सुद्धा भेटायला जातो, त्यांना ऑक्सफर्डसाठी अर्ज करायला सांगतो, मी त्यांना माझ्यासारख्या लोकांबद्दल सांगत असतो. “मी विंचेस्टरमध्ये होतो, माझा सर्वात चांगला मित्र इटनचा आहे, हे ऐकून ज्यांना आश्चर्य वाटतं आणि मग ते पण “हो, हो ठीक आहे.” असं म्हणतात, अशा लोकांपासून मी दूर असतो, असं देखील या व्हिडीओमध्ये ऋषि सुनक म्हणताना दिसून येतात.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच

आणखी वाचा : VIRAL VIDEO : म्हशीची शिकार करण्यासाठी एक-दोन नव्हे तर सात सिंहीणींचा घेराव, पण…पुढे काय घडतं पाहाच

ऋषि सुनक म्हणतात की, “मी भाग्यवान आहे की मी या ठिकाणी पोहोचलो, मी उच्चभ्रू वर्गात आलोय असं वाटू लागलंय. मी नेहमीच स्वतःला एक प्रोफेशनल मिडल क्लासमधला व्यक्ती मानत आलो आहे, मला वाटत नाही की केवळ आशियाई असण्याने तुमची व्याख्या बदलते.”

८ जुलै रोजी सुनक यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि पंतप्रधानपदासाठी प्रचार सुरू केला होता. बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रालयातील दोन मंत्र्यांनी ज्या प्रकारे राजीनामे दिले आणि त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे वेगवेगळे आरोप होत असताना त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला हे लक्षात घेण्यासारखे आहे.

आणखी वाचा : “नवरदेव खूप काळा आहे” म्हणत नवरीने लग्न तोडले, अपमान सहन न झाल्याने मुलाने काय केलं, पाहा

ऋषि सुनक यांचा हा व्हिडीओ लोक सोशल मीडियावर खूप वेगाने शेअर करत आहेत. काही युजर्सनी लिहिले की ऋषि सुनक लोकांपासून किती दूर आहे, तर दुसर्‍या युजरने लिहिले की बोरिस जॉन्सन देखील कामगार वर्गाच्या लोकांच्या फार जवळ नव्हते. निवडणूक प्रचाराच्या व्हिडीओमध्ये ऋषि सुनक हे स्पष्ट करतात की ते भारतीय वंशाचा कसे आहेत, चांगल्या आयुष्याच्या आशेने त्यांचे पणजोबा यूकेमध्ये कसे आले, माझ्या कुटुंबाने मला अशी संधी दिली ज्याची ते फक्त कल्पना करू शकतात. पण माझा देश ब्रिटेनने लाखो लोकांना चांगल्या भविष्यासाठी संधी दिली आहे.

आणखी वाचा : याला म्हणतात टॅलेंट! पियानो वाजवणाऱ्या घोड्याचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तोंडाने पाणी शिंपडत इस्त्री करणाऱ्याचा VIDEO VIRAL, किळसवाणे कृत्य कॅमेऱ्यात कैद

ऋषि सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. सुनक यांचा राजकीय प्रवास २०१५ मध्ये सुरू झाला, त्याआधी ते हेज फंड मॅनेजर होते आणि गोल्डमन सॅक्समध्ये गुंतवणूक बँकर म्हणून काम करत होते. ऋषि सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत २००९ मध्ये झाला होता.