भारताने अभिषेक शर्माच्या विक्रमी १३५ धावांच्या जोरावर इंग्लंडचा १५० धावांनी दारुण पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेा ४-१ ने खिशात घातली. अभिषेक शर्माच्या आक्रमक खेळीमुळे भारताने २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ ११व्या षटकात ९७ धावांवर गारद झाला. सामन्यानंतर अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्याला हजेरी लावली. इन्फोसिसचे प्रमुख आणि श्री सुनक यांचे सासरे नारायण मूर्ती यांनीही या सामन्याला हजेरी लावली होती. याचे फोटो ऋषी सुनक यांनी शेअर केले आहेत. यावेळी ऋषी सुनक यांनी नारायण मूर्ती यांच्यासोबत काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडवर १५० धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी खिशात घातली. यावेळी वानखेडेला भेट देण्यापूर्वी श्री. सुनक यांनी दक्षिण मुंबईतील पारसी जिमखान्याला भेट दिली आणि क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. १८८५ मध्ये सर जमशेदजी जेजीभॉय आणि चेअरमन जमशेदजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला पारसी जिमखाना मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मरीन ड्राइव्हच्या काठावर वसलेल्या या क्लबने क्रिकेटपटूंच्या अनेक पिढ्या घडवल्या आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी हे एक आदरणीय ठिकाण आहे. ऋषी सुनक यांनी रविवारी मुंबईला भेट दिली. यावेळी त्यांना पारसी जिमखान्यात टेनिस बॉल क्रिकेटने खेळण्याचा मोह आवरला नाही. क्रिकेट खेळातानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘टेनिस बॉल क्रिकेट खेळल्याशिवाय मुंबईचा प्रवास पूर्ण होत नाही,’ असे त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

याच कारणामुळे ऋषी सुनक हा शब्द आता गूगलवर सर्वाधिक सर्च झालेला कीवर्ड ठरला आहे. त्यामुळे सध्या ऋषी सुनक हे गुगुल ट्रेंड्समध्ये आहेत.

पाहा पोस्ट

भारताने इंग्लंडला पराभूत करून मालिका जिंकली

टीम इंडियाने टी-20 मालिकेतील पाचव्या सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेवर कब्जा केला आहे. भारताने ही मालिका ४-१ ने जिंकली. मुंबईत प्रथम फलंदाजी करताना भारताने २४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या ९७ धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून अभिषेक शर्माने १३५ धावांची खेळी केली. त्याने २ विकेट्सही घेतल्या. इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने अर्धशतक झळकावले.