River Rafting viral video : रिव्हर राफ्टिंगचे नाव ऐकले की आपल्या मनात पाण्याच्या लाटांचे आवाज घुमू लागतात. उन्हाळ्यात, लोकांना वॉटर अॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडतात, ज्यामध्ये रिव्हर राफ्टिंगचे नाव सर्वात वर येते. रिव्हर राफ्टिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. मात्र, पाण्यात बुडी मारणे जेवढे चांगले वाटते, तेवढीच या काळात खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान असाच एक रिव्हर राफ्टींग दरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.ऋषिकेशला येणारे पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्यायला विसरत नाहीत. रिव्हर राफ्टिंगसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. रिव्हर राफ्टिंगपूर्वी प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालायला सांगितले जाते, जेणेकरून मोठी दुर्घटना घडू नये. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राफ्टिंग दरम्यान राफ्ट रॅपिडमध्ये अडकल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्यामुळे बोट चालवणारा व्यक्ती हवेत दूरवर उडाल्याचं दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राफ्टिंग दरम्यान राफ्ट रॅपिडमध्ये अडकला, त्यामुळे कॅप्टन हवेत खूप दूर उडी मारताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ @sagargautam_53 ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्सना हसू अनावर झालं आहे. युजर्स व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका युजरने प्रतिक्रिया दिली आहे की, पाण्याचा वेग जास्त असल्याने येथे अनेकदा असे अपघात घडतात. तुम्ही पण हा मजेदार व्हिडिओ पहा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: यापेक्षा सुंदर काहीही असू शकत नाही! नवजात बाळानं आईला मारली मिठी अन् क्षणात…

व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “कॅप्टनने हवेत उडी मारली.” दुसऱ्या युजरने लिहिले, “राफ्टिंग आवश्यक आहे का?” त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “पोहण्याचा आनंद घेतला.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishikesh river rafting raft stuck in rapid during rafting guide jumped rishikesh viral video srk