Rishikesh Viral Video: ऋषिकेश हे भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. मोठ्या संख्येने लोक धार्मिक विधीसाठी येथे येतात. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋषिकेश हे पर्यटनस्थळ म्हणून देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाले आहे. यात आता ऋषिकेशमधील गंगा नदी काठावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही विदेशी पर्यटक अर्धनग्न अवस्थेत गंगा नदीत स्नान करताना दिसत आहेत, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडीओतील त्यांचे कृत्य पाहून नाराजी व्यक्त केली आहे.
गंगेच्या काठी बिकिनी, शॉर्ट घालून विदेशी नागरिकांची मज्जा मस्ती
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही विदेशी पर्यटक अर्धनग्न अवस्थेत पवित्र गंगा नदीत पोहण्याचा आनंद घेत आहेत. यात अनेक विदेशी महिलांनी बिकिनी घातली असून अनेक मुलं शॉर्टसमध्ये आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर असल्याप्रमाणे हे लोक गंगेच्या काठी मज्जा मस्ती करत पोहण्याचा आनंद घेत आहेत. अनेकांनी त्यांच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे.
@himalayanhindu नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पवित्र गंगा नदीला गोवा बीचमध्ये रुपांतरीत केल्याबद्दल धन्यवाद पुष्करसिंह धामी, आता ऋषिकेशमध्ये अशा गोष्टी घडत आहेत, ज्यामुळे लवकरच ते एक मिनी बँकॉक होईल.”
नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल
ऋषिकेश हे धर्म, अध्यात्म शहर न राहता आता बनत आहे गोवा
व्हिडीओ पाहून अनेकांनी ऋषिकेश हे आता धर्म, अध्यात्म आणि योगाचे शहर न राहता गोवा बनत आहे असे लिहिले आहे.
यावर एका युजरने लिहिले की, ऋषिकेशमध्ये अशा रेव्ह पार्ट्या/झॉम्बी कल्चरला प्रोत्साहन का दिले जात आहे? देवभूमी या कारणासाठी ओळखली जाते का? त्यांनी या पवित्र शहराचा नाश करण्यापूर्वी काहीतरी केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. ही पोस्ट उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना टॅग करण्यात आली आहे.
दुसऱ्या युजरने लिहिले की, हे लोक इथल्या लोकांची जीवनशैली आणि संस्कृती पाहण्यासाठी भारतात येतात, मग त्यांनी इथल्यासारखचं वागलं पाहिजे ना, बरोबर? इथे तुमची परंपरा का अंगीकारत आहात? आणखी एका युजरने लिहिले की, जेव्हा परदेशी पर्यटक येतील तेव्हा आम्हाला काही प्रमाणात तडजोड करावी लागेल. तर चौथ्या एका युजरने, धार्मिक शहरात अशा गोष्टी खपवून घेतल्या जाऊ नयेत, असे लिहिले आहे.