People Walk Through Fire Video: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक प्रकार समोर येत आहे. आजही अनेकजण अंधश्रद्धेचे बळी जातात. जळत्या निखाऱ्यावरून चालणे दैवी शक्तीचे असते.. असे मानणारा समाज हा भारतात आजही अस्तित्वात आहे. याचा बळी द्या आणि समस्या दूर करा, हे करा आणि आजार पळवा. भक्त गोळा करण्यासाठी हे बाबा वेगवेगळे स्टंटसुद्धा करत असतात. कधी जळत्या विस्तवावर चालतील तर कधी जळता कापूर गिळतील. अशा भोंदू बाबांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क धगधगत्या आगीत भाविकांनी उडी मारली आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ केरळमधील असून, होळी सण आता काही दिवसांवर आला आहे. सर्वत्र होळीची तयारी सुरू झालीय. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये देखील होळी साजरी केली जाते. याचपार्श्वभूमीवर हा उत्सव केरळमध्ये सुरु झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोक कसे धगधगत्या आगीतून उड्या मारत आहेत. एका बाजूने दुसऱ्या बाजूला ते आगीतूनच जात आहेत.

दरम्यान, व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये या बाबत माहिती देण्यात आली आहे. “केरळ, भारतातील श्री राजा राजेश्वरी मंदिरात हा विधी केला जातो. मंदिर परिसरातील अग्निमध्ये चालण्याचा हा सोहळा आहे. ही एक हिंदू धार्मिक प्रथा आहे जिथे देवी द्रौपदीने दिलेल्या इच्छा किंवा आशीर्वादाच्या बदल्यात भक्त अग्निकुंड ओलांडून जातात. ” असे लिहिण्यात आले आहे. नेटकरी हा व्हिडिओ पाहून पुरते हैराण आहेत. या अघोरी प्रथा असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Video: भरधाव कार थेट चहाच्या दुकानात! उल्हासनगरमधील अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

एकविसाव्या शतकात वैद्यकशास्त्र आणि विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आजही असे अनेक लोक आहेत जे वैद्यकीय उपचारापेक्षा भूतबाधाला अधिक महत्त्व देतात. हे याआधीही सिद्ध झालं आहे. काहींनी हा व्हिडीओ फक्त मनोरंजनापुरा मर्यादित ठेवला तप काही नेटकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणाविरोधी कायदा कुठे आहे असा सवाल उपस्थित केला आहे.