Shocking video : आग, वीज व पाण्याशी खेळू नये. एकदा त्यासंबंधीच्या दुर्घटनेत कोणी सापडले की, त्यातून वाचणे फार कठीण होऊन बसते. रिव्हर राफ्टिंगचे नाव ऐकले की, आपल्या मनात पाण्याच्या लाटांचे आवाज घुमू लागतात. उन्हाळ्यात लोकांना वॉटर अॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडतात; ज्यामध्ये रिव्हर राफ्टिंगचे नाव सर्वांत वर येते. रिव्हर राफ्टिंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. मात्र, पाण्यात बुडी मारणे जेवढे चांगले वाटते, तेवढीच खबरदारी त्यानंतर घेणे गरजे असते. दरम्यान, असाच एक रिव्हर राफ्टिंगदरम्यानचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृषिकेशला येणारे पर्यटक रिव्हर राफ्टिंगचा आनंद घ्यायला विसरत नाहीत. रिव्हर राफ्टिंगसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे येतात. रिव्हर राफ्टिंगपूर्वी प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालायला सांगितले जाते; जेणेकरून मोठी दुर्घटना घडू नये. मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये स्वत: मुख्य राफ्टरच रिव्हर राफ्टिंगदरम्यान वाहून गेला. त्यानंतर पर्यटकांची काय हालत झाली ते तुम्हीच पाहा…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये हृषिकेशमध्ये काही लोक रिव्हर राफ्टिंग करताना दिसत आहेत. त्यावेळी मुख्य राफ्टर सर्व पर्यटकांना पॅडल मारण्याचे आदेश देतो. दरम्यान, पाण्याचा जोरदार प्रवाह येतो आणि कमांड देणारा राफ्टर पाण्यात एका खडकाला धडकल्याने बोटीतून खाली पडतो. अशा स्थितीत त्याला काय झालेय हे त्याला बराच वेळ समजत नाही आणि बोटही त्याच्यापासून दूर जाते. यावेळी पर्यटकही घाबरतात. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्येकाने सुरक्षा जॅकेट घातले होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मुंबईत रस्ता ओलांडताना भीषण अपघात; चूक कुणाची? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

सुमित शर्मा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे; जो आतापर्यंत ६.६ दशलक्षांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला दोन लाखांहून अधिक वेळा लाइक केले गेले आहे. त्यावर युजर्स कमेंटही करीत आहेत. एका युजरने लिहिले… आता पुढे काय करायचे याचे रहस्यही ड्रायव्हरसोबत गेले. दुसऱ्या युजरने लिहिले… त्याच्यात काहीतरी वेगळे होते, आम्हाला फॉरवर्ड म्हटल्यावर तो स्वतः तिथेच थांबला. तर दुसऱ्या युजरने लिहिले… सरपंच साहेब निघून गेले. आता गावाची जबाबदारी कोण घेणार?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: River rafting viral video from rishikesh captain fell away from raft srk