Road Accident Video: सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो. अशातच गेल्या काही वर्षांपासून हिट अँड रनच्या केसेस वाढत चालल्यात. रस्त्यात आलेल्या माणसाला धडक द्यायची आणि काही नाही झालंय हे भासवून पुढे निघून जायचं, यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे का यावर अनेकदा प्रश्न पडू लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक वॅन स्कूटरचालकाला धडक देते आणि भरवेगात निघून जाते. या धक्कादायक घटनेत नेमकं घडलं तरी काय ते जाणून घेऊ या.

हेही वाचा… VIDEO: पायांच्या मधोमध ठेवला फटाका अन्…, तरुणाचा जीवघेणा स्टंट पाहून व्हाल थक्क

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक माणूस आपली बाईक घेऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाताना दिसत आहे. तेवढ्यात माणसाच्या डाव्या बाजूने भरधाव वेगात एक वॅन येते. अगदी काही सेकंदातच ती वॅन स्कूटरला धडक देते. स्कूटरला धडक देताच, त्या स्कूटरचे अक्षरश: तुकडे तुकडे होतात. नशीबाने या अपघातात त्या माणसाला कोणतीही इजा होत नाही.

हा व्हायरल व्हिडीओ @ni3_bokan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली असून बुक्कीत गाडीचा चुरा असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओला २.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्क

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत विचारलं, “चुकी कोणाची” तर दुसऱ्याने “काका वाचलेत बरं झालं” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “उंची कमी होती म्हणून वाचला भाऊ” एकजण कमेंट करत म्हणाला, “गाडीच गायब झाली राव” तर “गाडी जाऊद्या जीव तरी वाचला” अशी एकाने कमेंट केली.

हेही वाचा… भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”

दरम्यान, याआधीही अनेकदा अपघाताचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात अपघात करून कसलीही जबाबदारी न बाळगता कशाचीही चिंता न करता गुन्हेगार थेट पळ काढतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road accident van hit scooter smashed into pieces video viral on social media dvr