लग्नासाठी नवरदेवाकडची मंडळी वाजत गाजत वरात घेऊन येतात. काही लोकं रथ घेऊन येतात, काही घोडीवर बसून येतात, तर काहीजण लक्जरी कारमध्ये बसून येतात. परंतु असे एक प्रकरण समोर आले आहे जे आपल्याला आश्चर्यचकित करेल. बर्फवृष्टी आणि पाऊस यांच्यामुळे बंद झालेला रस्ता एका वरासाठी अडथळा ठरला, तेव्हा हा वर चक्क जेसीबी मशीन घेऊन आपल्या वधूला घेण्यासाठी पोहचला. ही घटना हिमाचल प्रदेशमधील सिरमौर प्रांतातील आहे. तेथील रस्त्यावर जवळपास ३ फुटांहून अधिक उंचीचा बर्फ साचला होता. वर येताच सासरच्या घरी लग्नाचे सर्व विधी पार पडले आणि त्यानंतर वर वधूसह घरी परतला.
रिपोर्टनुसार, वऱ्हाडी वरात घेऊन संगडाहजवळील सौंफर गावी जात होते. परंतु संगडाहपासून जवळपास आठ किलोमीटर पुढे बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद झाला होता. सुरुवातीला जेसीबीच्या मदतीने बर्फ हटवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु जेव्हा त्यानेही काम झाले नाही तेव्हा हे वऱ्हाडी कुटुंबासह जेसीबीनेच वधूला आणण्यासाठी निघाले.
Viral Video : दरीत अडकलेल्या ट्रकचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : रुग्णाचा उपचार करण्यासाठी नर्सने लढवली शक्कल; सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव
इतकेच नाही, वधूच्या पाठवणीनंतर वरात परतीच्या वेळी पुन्हा एकदा जेसीबीची मदत घ्यावी लागली. वर आणि वधूने तब्बल ३० किलोमीटरचा प्रवास जेसीबीने केला. संगडाहच्या वरच्या भागात शनिवारपासून बर्फवृष्टी सुरू आहे. सुमारे दोन ते तीन फूट बर्फवृष्टी झाल्यामुळे आजूबाजूच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.