Social media viral video: सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे. सोशल मीडियामुळे कधी कोणाच नशीब बदलेल काही सांगता येत नाही. एकवेळ अशी होती जेव्हा बहुतांश जण सोशल मीडियावर केवळ फोटो पोस्ट करायचे. पण हल्ली असंख्य व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाची ताकद सध्या इतकी वाढली आहे की या माध्यमातून उत्तम प्रकारे पैसेही कमवले जात आहेत. एवढंच नाहीतर सध्या समोर आलेल्या प्रकरणात एका व्यक्तीची चोरीला गेलेली बाईक चोरानेच परत आणून दिली आहे. तेही सोशल मीडियामुळे.

हो सोशल मीडियामुळे एका व्यक्तीला त्याची चोरीला गेलेली बाईक दोन दिवसात परत मिळाली आहे. एवढंच नाहीतर चक्क त्या चोरानेच ही बाईक परत केली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चला जाणून घेऊयात नेमकं प्रकरण…

bike thief shocking video viral
तुम्ही बाईक बिनधास्त कुठेही पार्क करताय? चोर अवघ्या सेकंदात अशी करतायत बाईकची चोरी; धक्कादायक VIDEO पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
Shocking Viral Video Scooter rider drag a man for 1 km
बाईकस्वाराने भररस्त्यात ओलांडली क्रूरतेची मर्यादा! वृद्धाला स्कुटीला बांधत फरपटत नेलं अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
Funny Video Viral you will laugh after seeing what these four drunk people did
“डोंट ड्रिंक अँड डाईव्ह खूपचं मनावर घेतलंय”; मद्याच्या नशेत तरुणांनी केलं असं काही की, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Horrible incident at the Kaziranga National Park in Assam shocking video
VIDEO: मृत्यू समोर दिसतो तेव्हा…समोर २ गेंडे अन् अचानक जिपमधून मायलेकी खाली पडल्या; जंगलातला थरारक शेवट आला समोर
aap leader gopal italia news
AAP Leader Video: …आणि आप नेत्यानं अचानक कंबरेचा पट्टा काढून स्वत:लाच मारायला सुरुवात केली; नेमकं घडलं काय?

सोशल मीडियाचा वापर कुणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी करतं तर कुणी प्रसिद्धीसाठी. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्यक्तीला त्याची चोरीला गेलेली बाईक मिळाली आहे. या व्यक्तीनं आपली बाईक हरवल्याची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट करत केली. फेसबूकवर या व्यक्तीनं अशी पोस्ट लिहली की घाबरून त्या चोरानं चक्क बाईकच परत आणून दिली.

मालकानं फेसबूकला शेअर केली अशी पोस्ट

ही घटना गुजरातमधील सुरत या ठिकाणी घडली आहे. बाईकच्या मालकानं या चोरीचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. पण त्यानं या व्हिडीओसोबत एक फेसबुक पोस्ट सुद्धा लिहिली. “श्रीमान सज्जन चोर, तुम्ही माझी बाईक घेऊन गेलात पण चावी आणि RC बूक मात्र घ्यायला विसरलात. या दोन गोष्टींशिवाय बाईक चालवणं तुम्हाला कठीण जाईल. पण तुम्ही काळजी करू नका, पार्किंगमध्ये जनरेटरजवळ या दोन्ही गोष्टी मी ठेवल्या आहेत. वेळ मिळेल तेव्हा घेऊन जा. अन् हो, माझी काळजी करू नका, मी सायकल सुद्धा चालवू शकतो.” अशा आशयाची पोस्ट बाईकच्या मालकानं शेअर केली.

पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/100001653942227/videos/332077252943034/

हेही वाचा >> बर्फाने गोठलेल्या पाण्यात पोहणं महागात पडलं; रस्ता चुकला अन्…Video चा शेवट पाहून येईल अंगावर काटा

ही पोस्ट चोरापर्यंत पोहचली अन् चोरानं चक्क बाईकच पार्किंगमध्ये आणून दिली.व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader