चाकूचा धाक दाखवत लुटलेल्या महिलेचा बँक बॅलेन्स पाहिल्यानतंर चोराने पैसे परत केल्याची अजब घटना समोर आली आहे. चीनमध्ये ही घटना घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेचे पैसे परत करणाऱ्या या चोराचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.

हेयुआन शहरातील आयसीबीसी बँकेत हा प्रकार घडला आहे. महिला एटीएममधून पैसे काढत असताना चोर तिच्या मागून येते आणि चाकूचा धाक दाखवतो. महिला एटीएममधून काढलेले 2500 युआन त्याच्याकडे सोपवते. यानंतर चोर तिला एटीएम कार्ड स्वाइप करत बँक बॅलेन्स दाखवण्याची मागणी करतो. महिलेच्या खात्यात काहीच पैसे नसल्याचं पाहून चोराचं मन बदलतं आणि तो लुटलेले पैसे पुन्हा परत करतो.

सीसीटीव्हीत चोर बँक बॅलेन्स पाहिल्यानंतर पैसे परत करतो आणि हसत हसत तेथून निघून जाताना दिसत आहे. चोराने मोठं मन दाखवलं असलं तरी पोलिसांपासून तो वाचू शकला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

Story img Loader