Viral video: दरोडा, चोरी, छेडछाडीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण यावेळी समोर आलेला व्हिडिओ जरा अजब आहे. ज्यामध्ये घराबाहेर बसून फोनमध्ये बिझी असलेल्या एका मुलीच्या हातातून दोन चोरटे फोन हिसकावून पळून जातात. समोर उभा असलेला तिचा मित्र जोरजोरात ओरडायला लागल्यावर मुलीला हा प्रकार कळला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
गेल्या काही वर्षापासून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसते.दिवस असो वा रात्र मोबाईल त्यांना हवाच असतो.मोबाईच्या नादात अनेकदा भयंकर अपघात घडले आहे त्यात त्यांना जीवही गमवावा लागला आहे.त्याच सध्या अशाच एका घटनेसंबंधित एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक मुलगी तिच्या घराबाहेर स्कूटरवर बसलेली असताना तिचा फोन वापरण्यात व्यस्त आहे. तिला हे माहित नाही की दोन दरोडेखोर तिच्या फोनवर लक्ष ठेवून आहेत. हे दोन दरोडेखोर फोनवर असलेल्या मुलीच्या जवळ येतात आणि फोन हिसकावून घेतात.होय, अतिशय आरामात आणि चलाखीने दोघेही दरोडेखोर मुलीच्या हातातील मोबाईल घेऊन तेथून दुचाकीवरून पळून जातात.
घटनेच्या काही सेकंदांनंतर, मुलीला समजते की तिचा फोन चोरीला गेला आहे, त्यानंतर ती आणि तिचा मित्र जोरात ओरडू लागतात.यानंतर काही लोक घरातून बाहेरही येतात, पण तोपर्यंत खेळ संपलेला असतो. मुलीचा मोबाईल दरोडेखोर पळून जातात.लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
पाहा व्हिडीओ
घर के कलेश नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २.३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. अशा स्थितीत सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले…दीदींना बराच वेळ समजले नाही नक्की काय झालं. तर दुसऱ्या युजरने लिहिले… तिला धक्काच बसला, तिला समजले नाही की काय प्रतिक्रिया द्यायची आहे.