करोनाच्या फैलावामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन सध्या घरात आहे. पण लॉकडाउन काळ सुरू असूनही त्याच्या बाबतीत एक विचित्र प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Shocking : क्रिकेटपटूच्या घरात सिलिंडरचा स्फोट; पत्नी गंभीर जखमी

नक्की काय घडलं?

ऑस्ट्रेलियातही करोनाने धुमाकूळ घातल्यामुळे तेथेही विलगीकरण आणि लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कसोटी कर्णधार टीम पेन हा त्याच्या दक्षिण होबार्ट विभागात घरात आहे. पण तरीदेखील त्याच्याबाबतीत एक अजब प्रकार घडला. लॉकडाउन काळात जिम बंद असल्याने तंदुरूस्त राहण्यासाठी पेनने आपल्या गॅरेजचे जिममध्ये रुपांतर करण्याचे ठरवले. त्यासाठी पेनने त्याच्या गॅरेजमध्ये असलेली त्याची कार बाहेर आणून पार्क केली. त्याच वेळी टीम पेनच्या कारची काच फोडून चोरांनी त्याचे पैशाचे पाकिट आणि इतर वस्तू चोरल्या आणि थेट मॅक्डोनाल्ड्स गाठलं. ऑस्ट्रेलियाच्या केंद्रीय बँकेकडून (National Australia Bank) पेनला या संबंधी फोन आला तेव्हा याबाबत उलगडा झाला.

काय म्हणाला टीम पेन?

टीम पेन

“मी सकाळी बँकेकडून आलेल्या मेसेजमुळे उठलो. त्या मेसेजमध्ये जे लिहिलं होतं ते पाहून मला खूपच विचित्र वाटलं. मेसेज वाचताच मी बाहेर गेलो. बघतो तर काय… माझ्या कारची काच फुटली होती. कार उघडून माझ्या कारमधून माझे पैशाचे पाकिट आणि इतर काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. बँकेच्या मेसेजमुळे मला कळलं की चोर येथून चोरी करून थेट मॅक्डोनाल्ड्समध्ये गेले. ते खूप भुकलेले असतील म्हणून त्यांनी तसं केलं असावं”, असं पेन या प्रकाराबाबत बोलताना म्हणाला.