Viral video: चोरीच्या अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानं व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अशाच चौरट्यांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश करत लाखो रुपयांचे दागीणे आणि रोख रक्कम लंपास केलीय.
हैदराबाद शहराती पट्टापागले येथील सोन्याच्या दुकानात चौरट्यांनी प्रवेश करत लाखो रुपयांचे दागीणे आणि रोख रक्कम लंपास केली. ही घटना मल्कपेटच्या अकबर भाग भागात असलेल्या किशवा ज्वेलरीच्या दुकानात घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, टोपी आणि मुखवटा घालून दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी ग्राहक असल्याचे दर्शवले. मात्र, त्यानंतर त्यांनी चाकूचा धाक दाखवत दुकानदाराला धमकावले. त्यानंतर त्यांनी दुकानातील दागीणे चोरले आणि गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीवर हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.
दागिन्यांचं दुकान म्हटलं की चोरीच्या घटना या आल्याच. सर्वाधिक चोरीचा प्रयत्न हा दागिन्यांच्या दुकानातच केला जातो. कारण एक लहानशी वस्तू चोरली तरी लाखो रुपयांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे चोर ज्वेलरी शॉपच्या दिशेने सर्वाधिक खेचले जातात.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बिबट्या निघाला मास्टरमाईंड; केवळ ८ सेकंदातच संपवला खेळ, थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
हा व्हिडीओ @TeluguScribeया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत.