Robbery Viral Video : रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहनं चोरीला गेल्याच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात. ही वाहनं चोरी करण्यासाठी चोर वेगवेगळ्या युक्ती वापरताना दिसतात. पण आता वाहनंच चोरी नाही, तर आता चालक वाहनात असतानाही त्यातील मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटनाही समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर चोर वाहनातील वस्तू चोरत असल्याचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्त्याच्या बाजूला पार्क करून जात असाल तर, सावधान!

व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक कार पार्क केल्याचे दिसतेय, ज्यात एक काकी आरामात बसल्या आहेत. याच संधीचा फायदा तीन ते चार चोरींनी घेतला. त्यांनी कारच्या अवतीभवती दोन-तीन फेऱ्या मारल्यानंतर त्यातील एकाने काकूंना तुमचे पैसे पडल्याचे सांगत त्यांना कारबाहेर येण्यास भाग पाडले. काकू कारबाहेर येताच चोरांनी मोठा हात साफ केला. यावेळी काकूंनी विचारही केला नसेल की, अवघ्या दहा रुपयांच्या नादात हजारो रुपयांचे नुकसान होईल. या काकू कारमध्ये नोटांनी भरलेली पर्स घेऊन बसल्या होत्या, जी चोरण्याचा कट चोरांनी रचला. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला पार्क करून जात असाल तर आता थोडी सावधानता बाळगा.

व्हिडीओत स्पष्टपणे पाहू शकता की, चोरांची एक टोळी सर्वप्रथम कारभोवती फेऱ्या मारून तपासणी करते. यावेळी कारमध्ये एक काकू बसल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत एक चोर हळूच कारजवळ आला आणि त्याने कारची खिडकी वाजवली आणि काकूंना त्यांच्या दहा रुपयांच्या नोटा खाली पडल्याचे सांगू लागला. हे ऐकून काकू कारच्या बाहेर उतरल्या आणि पैसे उचलू लागल्या, हीच संधी हेरून चोराच्या एका साथीदाराने कारमध्ये ठेवलेली हजारो रुपयांची पैशांची पर्स पळवली.

काकू सर्व नोटा गोळा करून कारमध्ये येत नाही तोवर चोर कारमधील पर्स घेऊन धावत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळाले. चोरीची ही पद्धत खरंच धक्कादायक आहे, त्यामुळे कार रस्त्यावर पार्क करून थांबत असाल तर जरा सावध रहा.