Dinosaur Eggs Found: मध्य प्रदेशातील एका गावातील रहिवासी मागील वर्षभर एका दगडी गोळ्याच्या स्वरूपातील वास्तूचे ‘कुलदेवता’ म्हणून पूजन करत होते मात्र याचबाबत आता एक थक्क करणारा खुलासा झाला आहे. गावकरी ज्या सापडलेल्या दगडी गोळ्यांची पूजा करत होते, ते दैवी नसून चक्क एका डायनासोरचे जीवाश्म अंडं असल्याचे समजत आहे. “कुलदेवता” आपल्या शेतजमिनीचे आणि पशुधनाचे संकट आणि दुर्दैवापासून रक्षण करतील या समजुतीनुसार, धारच्या पाडळ्यातील गावकरी शेती करताना सापडलेल्या दगडांची “काकड भैरव” किंवा भिलाट बाबा म्हणून पूजा करत होते.
गावातील रहिवासी वेस्ता मांडलोई यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत असे म्हटले की “आम्ही भिलाट बाबांना नारळ अर्पण करायचो आणि पूजा करायचो. गावकरी पावसात बकऱ्याही अर्पण करायचे.” मात्र, तज्ज्ञांच्या पथकाने जेव्हा गावाला भेट दिली तेव्हा हे दगड लाखो वर्षे जुनी डायनासोरची अंडी असल्याचे लक्षात आले आहे.
“काकर” म्हणजे जमीन किंवा शेत आणि “भैरव” म्हणजे स्वामी. मांडलोईप्रमाणेच, इतर अनेकांनी धार आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये खोदकाम करताना सापडलेल्या अशाच गोळ्यांची पूजा केली होती. लखनऊच्या बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेसच्या तज्ज्ञांनी नुकतीच या क्षेत्राला भेट दिली तेव्हाच तेथील रहिवाशांना समजले की ते ज्या दगडी गोळ्याची पूजा करत आहेत ते डायनासोरच्या टायटॅनोसॉरस प्रजातीचे अंडे आहे.
विभागीय वन अधिकारी (डीएफओ) एएस सोळंकी यांनी सांगितले की, “आमच्याकडे एक डायनासोर पार्क आहे जे २०११ मध्ये बांधले गेले होते. अनेक वेळा तिथल्या आसपासच्या खेड्यातील लोकांना असे जीवाश्म सापडतात आणि ते त्यांची पूजा करतात,” धार जिल्ह्यातील बाग परिसरात जीवाश्म संकलन आणि संवर्धन केंद्र आहे.
हे ही वाचा<< डॉ.आंबेडकरांच्या सन्मानार्थ बांधलेल्या ग्रंथालयाचा फोटो खोटा? १.२ दशलक्ष पुस्तकांच्या वास्तूचं खरं गुपित काय?
डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यानात विविध जुन्या काळातील जीवाश्म साठवले जातात. जिल्ह्यात आतापर्यंत अशी २५० हून अधिक डायनासोरची अंडी सापडली आहेत. मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात डायनासोरची चांगली संख्या होती असे मानले जाते. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की डायनासोर सुमारे १७५ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर फिरत होते. यापैकी हजारो प्रजाती नंतर सुमारे ६५ दशलक्ष वर्षांपूर्वी नामशेष झाल्या