जगात किती मूर्ख माणसं राहतात याची प्रचिती आपल्याला नेहमी येत असते. आता या मूर्खपणाचे टोकच चीन मधल्या एका दुकानदाराने गाठले आहे. आपल्या गोदामातील धान्य उंदीर खातो यामुळे दुकानदार आधीच चिडला होता. त्यातून त्याच्या तावडीत एक उंदीर सापडला. मग काय या चिडलेल्या दुकानदाराने त्या उंदराचे चारही पाय दोरीने बांधले आणि गुन्हेगाराला बांधतात तसे पाय बांधून त्याला उभे केलं. हे थोडं की काय या दुकानदाराने या उंदराच्या गळ्यात पाटीही अडकवली. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
वाचा : ४८ तासांत दिल्लीत सैन्य पाठवण्याचा दावा करणाऱ्या चिनी सरकारी वाहिनीचे भारतीयांनी काढले वाभाडे
चिनी लोक काय करतील याचा नेम नाही. चिनची सोशल मीडिया साईट् व्हिबोवर एक फोटो व्हायरल होत आहे. उंदराने धान्याच्या दुकानातील धान्यांची चोरी केली म्हणून त्याला दुकानदाराने दोरीने बांधून ठेवलं. वरून त्याच्या गळ्यात एक चिठ्ठीही अडकवली. ‘मी यापेक्षाही वाईट शिक्षेस पात्र आहे. आता तुम्ही मारून माझा जीव घेतला तरी तुमच्या दुकानातील तांदळाची चोरी केली असे मी कधीच मान्य करणार नाही’ अशी चिठ्ठी या दुकानदाराने त्याच्या गळ्यात अडकवली होती.
Viral Video : अबब! या वाहतूक कोंडीला म्हणायचे तरी काय
थोड्यावेळाने ही चिठ्ठी पुन्हा बदलली आणि त्याजागी दुसरी चिठ्ठी दुकानदाराने अडकवली. ‘मी शपथ घेऊन सांगतो यापुढे मी अशी चूक करणार नाही’ असे त्यावर लिहिले होते. या उंदराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चीनमधल्या काही ठिकाणी चोरी करणा-यांचे हातपाय असेच भर चौकात बांधले जातात आणि त्यांना शिक्षा दिली जाते. आता जिथे लोकांना अशी शिक्षा दिली जाते तिथे या उंदारांना तरी कसे सोडणार त्यामुळे ऐकावे ते नवलच! असेच म्हणावे लागले.
VIRAL VIDEO : नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणा-या चालकास सफाई कर्मचा-याने शिकवला धडा