टेनिसचा बादशहा रॉजर फेडरर जेव्हा कोर्टमध्ये उतरतो तेव्हा त्याच्यापुढे प्रतिस्पर्ध्यांच्या निभाव लागणं तसं अवघडच. त्याला खेळताना पाहणं म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी आणि टेनिसप्रेमींसाठी वेगळी पर्वणीच असते. नुकत्याच पार पडलेल्या हॉपमन कप टुर्नामेंटमध्ये रॉजर फेडरर आणि बिलिंडा बेनचीच हिनं मिश्र दुहेरी फेरीत जॅक सॉक आणि कोको व्हँदवेघचा पराभव केला. या सामन्यातील एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.
‘त्या’ फोटोमुळे सिरियन निर्वासिताला मिळाले जिमचे मोफत आजीवन सदस्यत्व
..आणि त्यानंही बदल स्वीकारला, ‘National Geographic’ चा पुरस्कार पटकावलेल्या फोटोमागची कथा
मिश्र दुहेरी फेरीत रॉजर विरुद्ध जॅक यांच्यात जबरदस्त सामना रंगला. हे दोघं एकमेकांविरुद्ध खेळत असताना आपण मिश्र दुहेरी सामन्यात खेळत असून आपल्या सोबत महिला टेनिसपटूदेखील आहेत याचा जणू या दोघांना पुरेपुर विसर पडला होता. रॉजरपुढे बिलिंडा आणि कोकोचं काहीचं चालेना. आपल्याला सर्व्हिस करायला कधी मिळेल याक्षणाची दोघीही वाट पाहत बसल्या, शेवटी कंटाळून दोघीही कोर्टमध्ये बसल्या. कदाचित आता तरी दोघांना आपण मिश्र दुहेरी फेरीत खेळत असल्याची जाणीव होईल असं त्यांना वाटलं. पण, याचा काहीही उपयोग झाला नाही. शेवटी कोको कोर्ट सोडून बाजूला जाऊन बसली, बिलिंडानंही तिचं अनुकरण केलं. या दोघींना कोर्ट सोडून जाताना पाहून उपस्थित प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
Men will be men….pic.twitter.com/13dsIh3PVS
Rishi Bagree IN (@rishibagree) January 13, 2018