टेनिसचा बादशहा रॉजर फेडररला Roger Federer टेनिस कोर्टवर खेळताना पाहणं ही त्याच्या चाहत्यासाठी मोठी पर्वणी आहे. पण जेव्हा टेनिसचा बादशहा कोर्टवर चक्क ‘किल्ट’ घालून खेळला तेव्हा मात्र त्याच्या चाहत्यांना आश्चर्य आणि आनंदाचा धक्का बसला.

स्कॉटलंडमधल्या ग्लासगो येथे रॉजर आणि अँडी मरे या दोन टेनिसपटूमध्ये सामना रंगला होता. एका चॅरिटी शोसाठी हे दोघंही एकत्र आले होते. बिंम्बल्डन स्पर्धेच्या काळात झालेल्या दुखापतीनंतर अँडी नव्या दमाने कोर्टवर दिसला. त्यामुळे त्याला आणि रॉजरला खेळताना पाहण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. पण मुलाखतीत रॉजरनं किल्ट घालून खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय त्याच्या इच्छेला मान देत आयोजकांनी ताबडतोब किल्ट आणून दिला. स्कॉटलंडचा हा पारंपरिक पेहराव आहे. जो साधारण स्कर्टसारखा दिसतो. रॉजरनं आवडीनं किल्ट परिधान केला आणि त्यात तो खेळलाही. ‘देश तसा वेश’ म्हणीनुसार रॉजरने कोर्टमध्ये केलेला नवा प्रयोग सगळ्यांनाच भावला.

Indigo Airlines Controversy : ‘माझ्या बॉसलाही तुडवा’, इंडिगोवरची उपरोधिक टीका सोशल मीडियावर व्हायरल

वडील झोपेत असताना ९ वर्षांच्या मुलीने फोनवरून बुक केली डिस्नेलॅण्डची ट्रीप

Story img Loader