गरिबी कोणाला किती लाचार बनवेल सांगता येत नाही, या गरिबीमुळे पदरात असलेल्या चार मुलांना शिकवायचं कसं असा प्रश्न तिला पडलाय. पण परिस्थितीमुळे मुलांना अशिक्षित ठेवायचं ही तडजोड एका आईला करणं शक्य नाही. तेव्हा मुलांच्या भविष्यासाठी या आईने किडनी विकण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

वाचा : वर्षभरापूर्वी मृत पावलेल्या भावाला घेऊन ‘तो’ रात्रभर सायकलवरुन हिंडला

रोहतामध्ये राहणाऱ्या आरती शर्मा या आईला आपल्या कुटुंबाची चिंता झोपू देत नाही. आरतीचे पती टॅक्सीचालक आहेत. यातून त्यांना दरमहिन्याला फक्त साडेचार ते पाच हजारांची कमाई होते. घरात कमावणारा एकच आणि खाणारी तोंडं दहा तेव्हा संसाराचा गाडा पुढे कसा चालवायचा हा प्रश्न दोघांनाही जगू देत नाही. त्यातून मोदी सरकारच्या नोटांबदीच्या निर्णयामुळे आपल्या व्यवसायाला मोठा फटका बसला आणि आपण गरिबीत दरीत ढकलत गेलो, असा आरोप आरतीने केला. आरतीने यापूर्वी मदतीसाठी योगी आदित्यनाथांकडे धाव घेतली. घरचा एलपीजी सिलेंडर काळ्या बाजारात विकून जे काही वरचे पैसे आले त्याचे तिकीट काढून तिने लखनऊ गाठले. तिने आपल्या घरची परिस्थिती योगी आदित्यनाथांपुढे मांडली. मुख्यमंत्र्यांनी देखील तिला मदत करण्याचे आश्वासन दिले. एप्रिल महिन्यात तिने आदित्यनाथांची भेट घेतली होती, पण अद्यापही तिला मदत मिळाली नाही.

Viral : तुम्हाला माहितीये सर्वाधिक वाढदिवस १ जूनलाच का असतात?

एकीकडे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे घरचे भाडंही थकलं आहे तेव्हा भाडं वेळेत मिळाले नाही तर घरमालकाने घराबाहेर काढण्याची धमकी आरतीच्या कुटुंबियांना दिलीय. त्यामुळे नाईलाजाने कुटुंबियांच्या भविष्यासाठी आपली किडनी विकण्याचा निर्णय तिने घेतला आहे.

Story img Loader