दुसरा टी-२० सामना जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे भारताच्या अनेक क्षेत्रांतून कौतुक केले गेले. परंतु, ज्या प्रकारचं प्रदर्शन फील्डिंगमध्ये केले गेले त्यावर तो खूश दिसत नाही. रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिका जिंकली आहे पण टीम इंडियाचे कॅचिंग स्कील थोडे चांगले असावे अशी त्याची इच्छा आहे. कोलकत्ता येथील ईडन गार्डन्सवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात, एका महत्त्वपूर्ण प्रसंगी काही झेल सुटले, ज्याबद्दल रोहित बोलत होता.

रोहितची प्रतिक्रिया

याआधी सामन्यादरम्यान भुवनेश्वर कुमारने त्याच्याच चेंडूवर उंच झेल सोडला तेव्हा रोहितची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. रोहित शर्माच्या संतप्त प्रतिक्रियेने अनेक चाहत्यांच्या नजरेत तो आला. भुवनेश्वर कुमारने धुआंधार फलंदाजी करणाऱ्या रोमन पॉवेलचा एक सोपा झेल सोडला होता. हा सामन्याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा होता. झेल सोडल्यावर रोहित शर्माने हताश होऊन त्याच्या पायाने चेंडू एका बाजूला फेकला आणि त्यानंतर तो खूप रागावलेला दिसला. रोहितने पुढे चेंडू ढकलला तेव्हा विरोधी संघाला अतिरिक्त धाव मिळाली.

school teacher along with the students
‘ही दोस्ती तुटायची नाय…’, शाळेतील शिक्षकानं विद्यार्थ्यांसह गायलं गाणं; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
no alt text set
ताईंचा विषय लय हार्ड! गाणी ऐकत ऐकत महिलेने…
The tiger lost its prey
‘भूक भागवण्यासाठी संघर्ष…’ शिकार हातातून निसटताच वाघ चवताळला… थरारक VIDEO एकदा पाहाच
Video of pandit told the importance of the seventh promise of Saptapadi during wedding
“कळत नकळत आमच्या कन्येकडून कोणतीही चूक झाली तर..” भटजीने सांगितले सप्तपदीतील सातव्या वचनाचे महत्त्व, पाहा VIDEO
little Girl's Honest Confession: "Mom Does Everything, But I Love Dad!"
“माझं सर्वकाही आई करते पण मला बाबा आवडतात”; चिमुकलीने स्पष्टच सांगितलं; पाहा Viral Video
shocking video
“जीवाशी खेळू नका…” Innova गाडी बुडाली थेट समुद्रात, Video होतोय व्हायरल
Young man abuses Waitress while she fight back hard viral video
अशा मुलांना हीच शिक्षा मिळाली पाहिजे! वेट्रेसला तरुणाने नको त्या जागी केला स्पर्श, संतप्त तरुणीने केलं असं काही की…, पाहा VIDEO
elderly lady's stunning dance
‘कोण म्हणतं मन म्हातारं होतं?’ वयोवृद्ध महिलेचा बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून व्हाल शॉक

(हे ही वाचा: मुंबईत होणार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक, ४०वर्षांनंतर भारताला मिळाले यजमानपद)

नेमकं काय झालं?

ही घटना १६ व्या षटकात घडली जेव्हा निकोलस पूरन आणि पॉवेल यांनी आपापल्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजला १८७ धावांच्या लक्ष्यात जीवदान दिले. भुवनेश्वर कुमारने नंतर एक शॉर्ट लेन्थ बॉल टाकला जो पॉवेलने लाँग-ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटच्या वरच्या बाजूला आदळला आणि हवेत उडला. त्याचवेळी भारतीय गोलंदाज झेल सोडण्यात अपयशी ठरले.

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

व्हिडीओ व्हायरल

रोहित शर्मा भुवनेश्वर कुमारजवळ उभा होता आणि त्याने रागाच्या भरात पायाने चेंडू पुढे ढकलला. भारतीय कर्णधारानेही ऋषभ पंतकडे निराशेने पाहिले. रोहित शर्मा बॉलला किक मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भारतीय कर्णधाराच्या या नव्या रुपाला पाहून क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत.

(हे ही वाचा: मणिपूरच्या कलाकारांसोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी धरला ठेका; सोशल मीडियावर Video Viral)

(हे ही वाचा: कच्च्या रस्त्यावरून चालत असताना ट्रकचे झाले दोन तुकडे; थरारक घटनेचा Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

चुका झाल्या म्हणून लीडरने अशी चीड दाखवू नये, असे चाहत्यांचे मत आहे. भुवनेश्वर कुमारने झेल सोडला असला तरी नंतर त्याने टाकलेले १९ वे षटक भारताच्या विजयाचे कारण ठरले. भुवनेश्वर कुमारने १९ षटकात केवळ ४ धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी २५ धावांची गरज होती. या शेवटच्या षटकात हर्षल पटेलमुळे भारताला ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवता आला.रोहित शर्माने सामन्यानंतर भुवनेश्वर कुमारने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.