IND vs NZ Rohit Sharma Mimics Shreyas Iyer: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आयसीसी विश्वचषक २०२३ चा उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आजच्या सामन्यासाठी प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम पासून ते बॉलीवूड कलाकार जसे की, सलमान खान, आमिर खान, रणबीर कपूर, किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा हे सुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित आहेत. या तारांकित स्टेडियममध्ये टीम इंडियाने पहिल्या दाव्यात फलंदाजी करत चमकदार कामगिरी केली आहे. शतकाधीश विराट कोहलीने आजच्या सामन्यात आपले ५० वे शतक पूर्ण केले आहे. तर त्यापाठोपाठ श्रेयस अय्यरने सुद्धा आज पुन्हा एकदा शतक ठोकले आहे. श्रेयसच्या शतकानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने गमतीत श्रेयसच्या सेलिब्रेशनची नक्कल करून दाखवली होती. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचाच चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

श्रेयस अय्यरने ६७ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर बॅट उंचावून उपस्थितांना अभिवादन केलं. १०५ धावांची महत्त्वाची खेळी करत श्रेयस अय्यर बाद झाला.श्रेयस अय्यरने ७० चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ८ षटकार खेळत १०५ धावा केल्या. अखेर मिशेलने त्याचा कॅच घेतला आणि तो बाद झाला.पण श्रेयसच्या शतकानंतर कॅमेरा जसा ड्रेसिंग रूमकडे फिरला तसा रोहित शर्मा रूममधून बाहेर येताना श्रेयसची नक्कल करताना दिसला. हा व्हिडीओ पाहून अनेकांना रोहितला कूल कर्णधार म्हटलं आहे तर काहींनी रोहितचं कौतुक करत तू कधीही कोणालाही हसवू शकतोस असं म्हटलं आहे.

Video: रोहित शर्माने केली श्रेयसची मस्करी, हसून व्हाल हैराण

हे ही वाचा<< विराट कोहलीने ५० व्या शतकाच्या खेळीतील टीमचा प्लॅन सांगितला! म्हणाला, “मी वाटेल ते करेन, टीमला मी सध्या..”

दरम्यान, रोहित शर्माने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या पूर्वसंध्येला दिल्या मुलाखतीत सुद्धा आपण टीमवर जास्त दबाव न टाकता खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यावर भर देत असल्याचे सांगितले होते. आजच्या सामन्याविषयी सांगायचे तर, कोहली व श्रेयस अय्यरचे शतक, गिलची ८० धावांची खेळी याच्या बळावर भारताने ३९८ धावांचे लक्ष्य दिले आहे. सध्या न्यूझीलंडचा स्कोअर १५ षटकात ८७ ला दोन बाद असा आहे.