टीम इंडियाने आशिया चषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता, परंतु सुपर-४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहलीची(Virat Kohli) कमाल खेळी पाहायला मिळाली, पण गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, सामन्यानंतर रोहित शर्मा चाहत्यांना पूर्ण उत्साहात भेटला आणि त्यांच्यासोबत सेल्फीही काढला. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका पाकिस्तानी चाहत्याने असे कृत्य केले की रोहित शर्मालाही म्हणावे लागले- ‘हात सोड’. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मॅच संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चाहत्यांना भेटण्यासाठी दुबई स्टेडियमवर पोहोचला. जिथे त्याचे काही पाकिस्तानी चाहतेही उपस्थित होते. यावेळी चाहत्यांच्या मागणीवर टीम इंडियाच्या कॅप्टनने ऑटोग्राफ आणि सेल्फीसाठी पोजही दिली. सेल्फी घेतल्यानंतर रोहित शर्मा चाहत्याशी हस्तांदोलन करत होता. पण, त्याला पाहून चाहत्यांना एवढा आनंद झाला की तो हात सोडत नव्हता. यावर रोहित शर्माला म्हणावे लागले “अरे, हात छोडो” तिथे उपस्थित असलेले सर्व चाहते जोरजोरात हसायला लागले.
( हे ही वाचा: सिंहणींच्या कळपाने एका झटक्यात केली बिबट्याची शिकार; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल)
भारत-पाक सामन्यानंतर चाहत्यांना भेटताना रोहित शर्माचा व्हिडीओ पहा
( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांनी शेअर केला डॉक्टरांच्या बदलत्या हस्ताक्षरचा व्हिडीओ; हसून हसून तुमचेही पोट दुखेल)
सुपर-४ मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारताचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग काय असेल, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील, तरच तो अंतिम फेरीत पोहोचेल. टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्ध ६ सप्टेंबरला, तर अफगाणिस्तानविरुद्ध ८ सप्टेंबरला सामना खेळायचा आहे.