IND vs PAK Match Updates Rohit Sharma Viral: भारतीय कर्णधार रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानला धूळ चाटताना भारतीय कर्णधाराने हा ही विक्रम आपल्या नावे केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचा समावेश झाला आहे. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित सामन्यात सलग आठव्यांदा पाकिस्तानला हरवल्यावर रोहित शर्माचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अचानकच रोहित पंचांकडे जाऊन त्यांना आपले बायसेप्स दाखवत असल्याचे दिसतेय.
वडापावमुळे चिडवणाऱ्यांना रोहित शर्माचं उत्तर?
रोहित शर्माच्या खाण्याच्या आवडी सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतात. हिटमॅनला वडापावचा किती मोठा चाहता आहे हे ही सगळ्यांना माहित आहे. दुर्दैवाने एखाद्या सामन्यात जेव्हा रोहितचा खेळ चुकतो तेव्हा सुद्धा त्याच्या खाण्यावर व फिटनेसवर प्रश्न करायला अनेकजण तयार असतात यासगळ्यांना उत्तर देणारी ही रोहित शर्माची कृती आहे असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये जबरदस्त सिक्सर मारल्यावर रोहित शर्मा आपलं बाहुबल दाखवताना दिसून आला आणि हाच त्याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
हे ही वाचा << IND vs PAK: हार्दिक पांड्या बॉलकडे बघून शिवी देत काय म्हणाला? इमाम उल हकच्या विकेटचं गुपित ऐका
दरम्यान, रोहितने मॅचनंतर फलंदाज किंवा सलामीवीर असण्याव्यतिरिक्त कर्णधार म्हणून काम कसे महत्त्वाचे आहे हे सांगितलं. रोहित म्हणाला की, “परिस्थिती नुसार काम करण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे हे ओळखणं महत्त्वाचं आहे. हे सगळं श्रेय संघाचं आहे. विश्वचषकात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या खेळाडूंनी त्यांनी खूप धावा केल्या. आम्ही आम्हाला काय करायचे आहे हे अगदी स्पष्ट ध्येय ठेवूनच आलो आहोत. कोण कुठल्या स्थानी फलंदाजी करणार आहे याबद्दल कसलीच शंका मनात नाही”.