रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना रंगला. दरम्यान या सामन्यापूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये एक चाहता सर्वांसमोर खुलेपणाने रोहितकडून किस मागताना कॅमेरात कैद झाला होता. दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा याच्या विसरभोळेपणाचे किस्से त्याच्या अनेक सहकार्यांनी शेअर केले आहेत. सध्या त्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असाच अजून एक त्याच्या वेंधळेपणाचा प्रकार समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रोहित शर्मा ग्राऊंडमध्ये इतर सहकार्यांसोबत गप्पा मारत आहे. खेळल्यामुळे तो घामाघुमही झालेला दिसत आहे. दरम्यान याच वेळी तो पाणी पिण्यासाठी बॉटल घेतो आणि चक्क बाटली न उघडताच तोंडाला लावत असल्याचं पहायला मिळालं आहे. रोहित शर्माच्या या व्हिडिओ वर त्याच्या चाहत्यांनी कमेंट द्वारा ‘फिरकी’ घेतलेली पहायला मिळाली आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.