Viral Video: आपण आजवर अनेकदा रस्त्यावर फिरणारे कुत्रे, मांजरी फार फार तर क्वचित कधीतरी हत्ती पाहिला असेल पण तुम्ही स्वप्नात तरी हा विचार केला आहे का सांगा.. तुम्ही दिवसभर काम उरकून मग संध्याकाळी फेरफटका मारायला म्हणून घरातून बाहेर पडत आहात, अचानक तुम्हाला गल्लीबोळातून चालताना एक गेंडा दिसतो. तो ही आपल्यासारखाच पाय मोकळे करायला निघालेला असतो. अर्थात धक्का बसेल ना? पण नेपाळमध्ये अशा प्रकारे रस्त्यात गेंडा दिसणे हे अत्यंत कॉमन मानले जाते, खरंतर असं आम्ही नाही तर हा इंस्टाग्रामवर व्हायरल होणारा व्हिडीओ सांगत आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने हा व्हिडीओ शेअर करून हे अत्यंत खास दृश्य असल्याचे म्हंटले आहे.
तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक गेंडा भररस्त्यात फिरायला निघाला आहे, या रस्त्यात फार गर्दी नसली तरी हा वर्दळीचा रस्ता असल्याचा अंदाज आपण लावू शकता. गेंड्याला पाहून सुरुवातीला रस्त्यावरची कुत्री-मांजरीही गोंधळून जातात. एक कुत्रा तर पार त्या गेंड्यावर भुंकायला जातो पण अर्थात त्या महाकाय प्राण्याच्या शक्तीचा अंदाज येताच तो पण मागे फिरतो. रस्त्यात काही माणसंही चालताना दिसत आहेत जे सुद्धा सुरुवातीला गेंड्याला बघून थक्क होतात.
भररस्त्यात गेंड्याची भ्रमंती
रोहित शर्माची बायको म्हणते…
हे ही वाचा<< Video: १४ म्हशींचा सिंहावर हल्लाबोल; सिंहाने हवेत उडी मारताच म्हैस अजून चिडली, असं काही केलं की..
इंस्टाग्रामवर @Unilad या अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. @ContentBible या वापरकर्त्याने हा व्हिडीओ शूट केला असल्याचे यात म्हंटले आहे. गेंड्याच्या भ्रमंतीचा हा क्षण रोज पाहायला मिळत नाही पण जर तुम्ही नेपाळ मध्ये राहात असाल तर… असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.