सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही घाबरून जाल. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्यामध्ये अचानक अपघात होतो. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एस्केलेटरवरून जाणाऱ्या लोकांचा अचानक अपघात होतो. हा अपघात नेमका कुठे घडला हे कळू शकले नाही, मात्र हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एस्केलेटरवरून लोक जात असल्याचे दिसत आहे. त्यानंतर अचानक या एस्केलेटरवर काहीतरी पडते आणि लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. लोक इकडे तिकडे धावू लागतात. या एस्केलेटरवर बरेच लोक उभे होते. वर काहीतरी आवाज येत असल्याचं लोकांच्या लक्षात येतं आणि काही कळेपर्यंत वरून छप्पर पडतं. या अपघातानंतर लगेचच तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्या छताखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या छताच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेले लोक खूपच घाबरले होते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Accident video: ट्रेनच्या गेटला लटकत करत होता प्रवास! अचानक विजेच्या खांबाला धडकला अन् जागीच…
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी अनेक कमेंट करत आहेत. एका यूजरने या व्हिडिओवर ‘मेड इन चायना’ असे लिहिले आहे. या अपघातानंतर लोक एस्केलेटरवरून खाली उडी मारतानाही दिसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत ९.५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या अपघाताचा व्हिडिओ तिथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला, त्यानंतर तो व्हायरल झाला.