Rose Day 2025: फेब्रुवारी महिना उजाडला की तरुणाईला प्रेमाचे वेध लागतात. सात फेब्रुवारीपासून त्याला सुरुवात होते. या दिवशी साजरा होणारा रोझ डे हा नेमका काय असतो याविषयी अधिक जाणून घ्या. रोझ डे व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची सुरुवातही ही रोझ डेनं होतं असते. बुधवारी ७ फेबुवारी २०२५ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुबालाब देऊ शुभेच्छा दिल्या जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी महिना हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना असतो. याच महिन्यात १४ तारखेला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. त्या दिवशी जोडपी आपलं एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त करतात. याची सुरुवात या महिन्याच्या ७ तारखेपासूनच होत असते. ७ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन वीकमधला पहिला दिवस असतो आणि या दिवशी रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपी आपल्या जोडीदाराला गुलाबाचं फूल देतात आणि आपल्या मनातली भावना व्यक्त करतात. काही जोडपी या दिवसाची विशेष आठवण म्हणून गुलाबाच्या बरोबरच काही भेटवस्तूसुद्धा देतात. तुम्ही कधी विचार केला आहे, का की प्रत्येक वर्षी ७ फेब्रुवारीलाच रोझ डे का साजरा केला जातो? काय आहे याचं महत्त्व आणि नेमका काय आहे या मागचा इतिहास? त्याविषयी जाणून घेऊ या.

प्रेम म्हटलं की डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे गुलाबाचं फुलं. त्यातही लाल रंगाचे गुलाब म्हणजे प्रेमाचे प्रतिकच. रोझ डे साजरा करण्याची सुरुवात मुघलांच्या काळात झाली. मुघल बेगम नुरजहाँला लाल गुलाब खूप आवडायचे. नुरजहाँ खूश राहावी म्हणून तिचे पती रोज भरपूर ताजे गुलाब नुरजहाँच्या महालात पाठवायचे. नुरजहाँला रोज हे गुलाब बघून खूप आनंद व्हायचा. याच्या शिवाय रोझ डेसंबंधित आणखी एक गोष्ट सांगितली जाते. व्हिक्टोरिया राणीच्या काळात प्रेम व्यक्त करताना लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब द्यायचे. त्याचवेळी गुलाब देण्याची आणि घेण्याची परंपरा सुरु झाली. व्हिक्टोरियन आणि रोमन लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब द्यायचे.

गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांमागील अर्थ

लाल गुलाब

लाल रंग प्रेम, सौंदर्य दर्शवतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा गुलाब दिला जातो. लाल गुलाबाचं फूल आपल्या मनातल्या भावना समोरच्याला सांगण्यासाठीचा एक मार्ग असतो. हे फूल निर्मळता, निरागसता आणि प्रेमाचं प्रतीक असतं. एकमेकांमध्ये भांडण झालं असेल, तर ते मिटवून प्रेम वृद्धिंगत करण्यासाठीही गुलाबाचं फूल दिलं जातं. एकंदरीत लाल गुलाबाच्या फुलाचा प्रेम आणि प्रेमी युगुलांशी खूप जवळचा संबंध आहे.

गुलाबी गुलाब

गुलाबी गुलाब हे कौतुकाचं प्रतीक आहे. जर तुम्हाला कोणाची स्तुती करायची असेल तर त्यांना गुलाबी रंगाचा गुलाब देऊ शकता. व्हॅलेंटाइन डे हा केवळ पार्टनरसोबत प्रेम करण्यासाठी नसतो. तुम्ही आई, वडील, शिक्षक, भाऊ, बहीण, मित्र यांच्या विषयीही प्रेम व्यक्त करू शकता. त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्ही त्यांना गुलाबी गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करु शकता.

पिवळा गुलाब

पिवळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे. कुणाशी मैत्री करायची असल्यास तुम्ही पिवळा रंगाच गुलाब देऊ शकता, समोरच्या व्यक्तीने तुमचा गुलाब स्वीकारला तर त्याने तुमची मैत्री स्वीकारली असा अर्थ होतो.

Photo: Google trend

गुगलवरही व्हॅलेंटाइन वीकमधला पहिला दिवस रोझ डे ट्रेंडींगवर आहे.

केशरी गुलाब
केशरी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. केसरी रंगाच्या गुलाब हा कुणाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी असतो. एखाद्याबद्दल प्रचंड उत्कटता असेल तर तुम्ही त्या व्यक्तीची भेट घेऊन केशरी रंगाचा गुलाब देऊ शकता.

पांढरा गुलाब

पांढरा रंग शांततेचे प्रतीक मानला जातो. पांढरा गुलाब हे शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा आकर्षण असेल तर त्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचा गुलाब दिला जातो.

(टिप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.)