Viral Video: अनेकदा प्रवासादरम्यान वाहन चालकांमध्ये भांडण होते. अशा भांडणात कोणी मध्यस्ती केली तर बरं नाही तर कधी कधी हे भांडण इतकं टोकाला जाते की, हाणामारी पर्यंत देखील जाऊन पोहचते. तर आज असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत संतप्त रिक्षा चालकांनी कार चालकाच्या गाडीची खिडकी फोडली आहे. काय आहे नेमकं प्रकरण चला पाहू.

बंगळुरूमध्ये इजीपुरा सिग्नलवर सुमारे १ वाजून ४५ मिनिटांनी दुपारी ही घटना घडली. कार चालकाने लाईव्ह जाऊन या गोष्टीचे प्रसारण केलं आहे. गाडी चालकाच्या म्हणण्यानुसार, त्याला एका ठिकाणी त्वरित पोहचायचे होते. त्यामुळे तो अधिक वेगाने त्याचे वाहन चालवत होता. पण, काही ऑटो रिक्षा चालक त्या मार्गावर होते. पुढे जाण्यासाठी रस्त्या न दिल्याचा संतप्त रिक्षा चालकांचा आरोप आहे. तर या रिक्षा चालकांनी या गोष्टीचा राग डोक्यात ठेवत, वाहन चालकाच्या गाडीजवळ जाऊन त्याच्याशी आक्रमकपणे संवाद साधला, धारदार वस्तूने कारची खिडकीची काच सुद्धा फोडली व त्याचा फोन हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
lalpari
तुम्हीच सांगा, चूक कोणाची? दरवाजा एकीकडे अन् पायऱ्या दुसरीकडे, चालकाने दाखवली चूक; पाहा ‘लालपरी”चा Video Viral
misunderstanding of kidnapping because of girl scream in car
कारमध्ये आरडाओरड करणे आले अंगलट, काय घडले?

हेही वाचा…मधमाश्यांच्या पोळ्यातून कसा काढला जातो मध? VIDEO पाहून अंगावर येतील शहारे; म्हणाल, ‘मेहनत…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हे सर्व रिक्षा चालक कन्नड भाषेत कार चालकाशी रागाने बोलताना दिसत आहेत. तसेच कारची काच फोडल्यानंतर वाहन चालकाच्या अंगावर व संपूर्ण कारमध्ये काच देखील पडली आहे ; त्यामुळे तो जखमी झाला. वाहन चालकाने कानातून रक्त येत असल्याचाही आरोप या रिक्षा चालकांवर केला आहे.हा संपूर्ण प्रकार वाहन चालकाने स्वतःच्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeamBHPforum या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, “कृपया तुमचे संपर्क डायरेक्ट मेसेज करून कळवा. अशा परिस्थितीत तुम्ही त्वरित मदतीसाठी ११२ डायल करू शकता” ; असे पोलिसांनी या घटनेला प्रतिसाद दिला आहे. सध्या या थरारक घटनेनं सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Story img Loader