Royal Bengal Tiger Enters Inside Farm : वन्य प्राण्यांमध्ये रॉयल बंगाल टायगर सर्वात खतरनाक आणि हिंस्र प्राणी म्हणून ओळखले जातात. जंगलातील कोणताही प्राणी त्यांच्याशी पंगा घेत नाही. पण शिकारीच्या शोधात असल्यावर हे वाघ माणसांवरही भयानक हल्ला करतात. अन्न आणि पाण्याच्या शोधात निघालेले वाघ क्वचितच मानवी वस्तीत किंवा शेतात येतात. पण जर कधी या वाघांचा सामना करण्याची वेळ आली, तर अनेकांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहता नाही. अशाच प्रकारचा थरकाप उडवणारा दोन वाघांचा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. शेतकरी शेतात ट्रॅक्टर फिरवत असताना अचानक मोठा वाघ समोर येतो, त्यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

वाघ शेतात बिंधास्तपणे फिरत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वाघाच्या बाजूला काही अंतरावर एक शेतकरी ट्रॅक्टरने नांगरणी करत असल्याचं दिसत आहे. शेतकरी या वाघापासून दूर उभा असला तरीही वाघ हल्ला करण्याची शक्यता टाळता येत नाही. पण हा वाघ शांतपणे शेतातून दुसऱ्या जागी निघून जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हे संपूर्ण थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसंच दुसरा एक शेतकरी शेतात काम करत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
Maharashtra tiger deaths
Tiger Deaths : राज्यात १० दिवसांत पाच वाघ मृत्युमुखी…
The tiger reached the dog through the crowd of tourists
‘मरण थांबवणं कोणाच्या हातात आहे…’ पर्यटकांच्या गर्दीतून वाघाने श्वानाला गाठलं; घटनेचा थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा
Tiger attack Viral Video
जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो… वाघाने वाऱ्याच्या वेगाने केला बिबट्यावर हल्ला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

नक्की वाचा – पॅसिफिक महासागरात सर्फिंगला गेलेल्या तरुणाला सापडला ‘हा’ दुर्मिळ मासा, सर्वांना चकीत करणारा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

भारतीय वन अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, ट्रॅक्टर्स आणि वाघांचं सहअस्तित्व…हीच ताकद आहे. जेव्हा दुसऱ्या देशातील वाघांच्या संख्येत घट होणार नाही, तेव्हा आपल्या देशात वाघांची संख्या वाढेल. रमेश पांडे यांनी हा व्हिडीओ सर्वात आधी शेअर केला. व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून यूजर्स या व्हिडीओला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader