क्रिकेट हा भारतासह जगभरातील लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. भारतात धर्मवेडय़ांप्रमाणेच क्रिकेटवेड्या लोकांचा एक वेगळा गट आहे. अनेक तरुणांचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असतं. सध्या आयपीएलचे सामने जोरदार सुरु आहेत. यामध्ये यावर्षी तरी आरसीबी ट्रॉफी जिंकेल का या प्रतिक्षेत चाहते आस लावून आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु २००८ पासून आयपीएल खेळत आहे. मात्र विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं अद्याप एकदाही IPL ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं नाही. बरं, RCB काही छोटी टीम नाही. दरवर्षी त्यांच्या संघात जगभरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू खेळतात. त्यामुळे RCB फॅन्सला अनेकदा ट्रोल केलं जातं. त्यांची फिरकी घेतली जाते. दरम्यान अशाच ट्रोलिंगला वैतागलेल्या काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कोहलीला विनंती करण्यासाठी एक गाणं बनवलं आहे. हे गाण ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल यात शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसीबीची खराब सुरुवात –

आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. आरसीबीला पहिल्या तीन सामन्यात दोन सामने गमावावे लागले. पहिल्याच सामन्यात चेन्नईने सहा विकेटने आरसीबीला हारवलं होतं. त्यानंतर शुक्रवारी कोलकात्याने आरसीबीचा सात विकेटने पराभव केला. आरसीबीने पंजाबविरोधात चार विकेटने विजय मिळवला. आता याच पार्श्वभूमीवर काही चाहत्यांनी विराट कोहलीला विनंती करण्यासाठी एक गाणं बनवलं आहे. यामध्ये एका कॉलेजच्या मैदानात मोठ्या संख्येने तरुण तरुणी उपस्थित आहे. यावेळी के गाण सादर करतात. या गाण्याचे बोल “अहो १५ वर्ष झाली तरी भोग संपाना, हृदय नको कोहली आता ट्रॉफी जिंका ना, अहो हृदय नको कोहली आता ट्रॉफी जिंका ना” असे आहेत.

हे विद्यार्थी फक्त गाणंच बोलत नाहीयेत तर नाचतही आहेत. यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हातात पोस्टरही पाहायला मिळत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पाठीचा कणा वाकला तरी पोराच्या शिक्षणासाठी धडपडणारा ड्रायवर बाप; VIDEO पाहून कळेल बाप काय असतो

२००८ मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. तेव्हापासून आरसीबीने तीन वेळा फायनलमध्ये धडक मारली, पण चषक जिंकता आला नाही. त्यामुळे आरसीबीचे चाहते नाराज आहेत, त्याशिवाय त्यांनाही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर rohitt__415 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नोटकऱ्यांच्या चांगलात पसंतीस पडला असून खास करुन आरसीबी फॅन्सही या व्हिडीओखाली प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओला आतापर्यंत लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत.