Royal Enfield Bullet Fire On Road: बुलेट अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. तरूणाईमध्ये या बाईकची क्रेझ दिसते. अनेकजण आपल्या बुलेटला एवढं जपतात की त्यावर आलेला एक ओरखडाही त्यांना सहन होत नाही. पण सध्या एक व्हीडिओ वाऱ्या सारखा व्हायरल होतोय. यात नव्या कोऱ्या बुलेटला आग लागलेली पाहायला मिळतेय.ही गाडी खरेदी करण्याची अनेकांची इच्छा असते. पण तिची किंमता पाहता अनेकांच्या खिश्याला ती परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं स्वप्न अधुरं राहतं. पण ही आपली स्वप्नवत गाडी डोळ्यासमोर जळून खाक झाली तर…? ही कल्पना करणंही अनेकांना परवडणारं नाही. आतापर्यंत आतापर्यंत आपण अनेक चारचाकी गाड्यांना, इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण बुलेटला लागलेली आग ही दुर्मिळ घटना आहे. पुण्यात भर दुपारीएका नव्या कोऱ्या बुलेटला भीषण आग लागली. याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.

बुलेटला आग लागल्यानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिथं उपस्थित असलेले लोकसुद्धा याबाबत आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गाडीची पेट्रोल टाकी फुटल्याचं नंतर दिसून आलं. बुलेटला दुपारच्या भर उन्हात आग लागल्यामुळे आजूबाजूची वाहनेही लांब गेली. तर भररस्त्यात घडलेल्या घटनेने वाहनचालकांनी काही वेळ आपली वाहने थांबविली होती. दरम्यान यावेळी बुलेटचा मालक आणि काही लोक टँकरमधून पाणी बुलेटवर टाकत आहेत. तरीही आग काही आटोक्यात येत नाहीये. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गाडीला लागलेली आग आटोक्यात आणली. हा प्रकार पाहून लोक घाबरले. आणि सर्वत्र एकच गोंधळ माजला. दरम्यान नवीकोरी बुलेट फुटली तरी कशी? हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे.

FASTAG, road tax Mumbai, traffic jam Mumbai,
दुसऱ्या दिवशीही पथकराचा गोंधळ कायम, फास्टॅगमधून पैसे कापल्याचे संदेश, मार्गिकांच्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
pune couple beaten up
पुणे: बाणेर टेकडीवर पुन्हा लूट, फिरायला आलेल्या तरुणासह मैत्रिणीला मारहाण
metro services
‘मेट्रो ३’ विस्कळीत, दोन दिवसांतच तांत्रिक अडचणी
Passengers upset, Kasara local time, Karjat local time,
शेवटच्या कसारा, कर्जत लोकलच्या वेळा बदलल्याने प्रवासी नाराज
Delhi Police
Delhi Police : “आज त्याला संपवूया”, कॉन्स्टेबलला गाडीखाली चिरडणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
st bus maharashtra, buses, ST, ST corporation,
आनंदवार्ता… ‘एसटी’च्या ताफ्यात आणखी २,५०० बसगाड्या येणार
truck out of hole pune, paver block collapse pune,
पुणे : चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ट्रक आणि दुचाकी खड्ड्याबाहेर, पेव्हर ब्लॉक खचल्याने घडली घटना

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> उन्हाळ्यात कुलरमुळे विजेचं बिल खूप येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; पैशांची होईल मोठी बचत, VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ @suraj_modi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे पुणेकरांनो वाहन चालवताना जरुर काळजी घ्या.